AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad : ‘तुम्ही ज्या घोड्यावर बसलात, तो त्या घोड्याचाही अपमान आहे, कारण..’ जितेंद्र आव्हाडांवर जिव्हारी लागणारी टीका

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी काल ठाण्यात घोड्यावर बसून आंदोलन केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. आता राज्यातील एका शेतकरी नेत्याने आव्हाड यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

Jitendra Awhad : 'तुम्ही ज्या घोड्यावर बसलात, तो त्या घोड्याचाही अपमान आहे, कारण..' जितेंद्र आव्हाडांवर जिव्हारी लागणारी टीका
Jitendra Awhad
| Updated on: May 13, 2026 | 12:43 PM
Share

मध्य पूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काही महत्वाची आवाहनं केली आहेत. त्यात दोन मुख्य आवाहनं आहेत ती म्हणजे वर्ष भर सोनं खरेदी न करणं आणि दुसरं पेट्रोल-डिझेल बचतीच. कारण या दोन्ही गोष्टींच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होतं. सध्या डॉलरचा रेट 100 च्या आसपास आहे. त्यामुळे दररोज रुपया कोसळत आहे. देशाच्या तिजोरीवर आणि अर्थव्यवस्थेवर याचा भार येत आहे. म्हणून मोदींनी देशातील जनतेला काही आवाहनं केली आहेत. पण विरोधी पक्षांनी लगेच यावरुन मोदी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांवर टीका केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यापुढे जात चक्क घोड्यावर बसून आंदोलन केलं.

यावेळी बोलताना आमदार आव्हाड यांनी म्हणाले की, “अख्या देशाला संदेश आहे. या देशाची पातळी कुठे आणून ठेवली मोदी साहेबांनी. बंगालचे इलेक्शन होईपर्यंत चूप बसले आणि त्यानंतर हे सगळं नाटक सुरू झालेलं आहे” “स्वत: परदेशी फिरायचं मात्र इथे लोक उपाशी आहेत. एक प्रसिद्ध म्हण आहे, ‘वारे मोदी तेरा खेल… सस्ती दारू महंगा तेल’. तेलाचे भाव गगनाला गेले आहेत. काही फरक पडत नाही. एका-एका मंत्र्यांच्या मागे सात सात गाड्या फिरत आहेत. सगळा तमाशा करून टाकला आहे या देशाचा. देशाची परिस्थिती गेल्या दोन वर्षांपासून अशीच आहे. हे अजून याच्यापेक्षा खाली जाणार आहे. परिस्थिती सुधारणार नाही. महागाई आणखी वाढणार आहे” असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

मोदींचे आव्हान तुम्हाला काय कळणार ?

आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान सह इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कार्यालयापासून थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयापर्यंत बैलगाड्या, घोडागाडी घेऊन आंदोलन केलं. आता शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घोडागाडी आंदोलनावर टीका केली आहे. ते आव्हाडांना जिव्हारी लागणारं बोलले आहेत. “मोदींचे आव्हान तुम्हाला काय कळणार ?. “गधा क्या जाने गुड क्या चीज होती है?” अशा शब्दात त्यांनी आव्हाडांवर टीका केली.

Follow Us
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्या पत्रकार परिषदेत हे काय सांगितलं?
ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोर
Arvinad Swanat | ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोरच...
ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar | ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत...
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह... पहा व्हिडीओ
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...