AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : ‘गोष्ट एका पैठणीची..’ लेक रेवतीचं लग्न आणि 35 वर्षांपूर्वीची पैठणी ! सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लेक रेवतीच्या लग्नात स्वतःच्या लग्नातील 35 वर्षांपूर्वीची पैठणी साडी परिधान केली. या खास क्षणाचे फोटो शेअर करत त्यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली. ही साडी केवळ वस्त्र नसून, आठवणी आणि भारतीय विणकरांच्या कौशल्याचा वारसा आहे, अशा शब्दांत त्यांनी कारागिरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Supriya Sule : 'गोष्ट एका पैठणीची..' लेक रेवतीचं लग्न आणि 35 वर्षांपूर्वीची पैठणी ! सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
सुप्रिया सुळे यांनी सांगितली एका खास साडीची गोष्ट Image Credit source: social media
| Updated on: Jun 27, 2026 | 12:18 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीचं, रेवती हिचं लग्न नुकतं पार पडलं. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून ती खूप चर्चेत आहे. 20 जून रोजी रेवती आणि सारंग लखानी यांचं लग्न झालं. याचे काही फोटो सुप्रिया सुळे यांनी आधी पोस्ट केले होते. आता त्यांनी याच लग्नातला एक आणखी फोटो टाकत खास आठवणही शेअर केली आहे. लेकीच्या, रेवतीच्या लग्नात त्यांनी नेसलेली खास साडी, त्याची गोष्ट त्यांनी या पोस्टमधून सांगितली आहे.

रेवती -सारंग हिच्या लग्नात सुप्रिया सुळे यांनी हिरवीगार, सुंदर बॉर्डर असेलली अप्रतिम साडी नेसली होती. मात्र ही साडी त्यांच्यासाठी खूप खास आहे. कारण ही साडी त्यांच्याच लग्नातील आहे. 35 वर्षांपूर्वी सदानंद सुळे यांच्याशी सुप्रिया सुळेंचं लग्न झालं. त्यावेळी ही साडी त्यांनी वधूवस्त्र म्हणून नेसली आणि तीन दशकांनी त्यांनी मुलीच्या लग्नात वधू माय म्हणून नेसली. लग्नातील एक फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी त्या आठवणींना उजाळा दिला.

सुप्रिया सुळे यांची खास पोस्ट काय ?

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटव दोन फोटो पोस्ट करत एका साडीची खास गोष्ट शेअर केली आहे. काय आहे त्यांची पोस्ट, वाचूया त्यांच्या शब्दात, जशीच्या तशी..

” मुलांचं लग्न हा प्रत्येक आई-वडिलांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. सुमारे ३५ वर्षांपूर्वी, ४ मार्च १९९१ रोजी ‘वधू’ म्हणून माझ्या लग्नात नेसलेली पैठणी ‘नवरीची आई’ म्हणून रेवती आणि सारंग यांच्या २० जून रोजी झालेल्या विवाहसोहळ्यात पुन्हा परिधान करण्याचा योग आला.

ही पैठणी छत्रपती संभाजीनगर येथील विणकर बशीरजी यांनी अत्यंत कौशल्याने विणलेली आहे. ती पुन्हा नेसताना अनेक आठवणी जाग्या झाल्या आणि आनंदात आणखी भर पडली.

काही गोष्टींचं सौंदर्य काळानुसार अधिकच खुलत जातं. या पैठणीत केवळ रेशमाचे धागे नाहीत, तर आठवणी, संस्कृती आणि आपल्या कारागिरांच्या कष्टांची समृद्ध परंपरा विणलेली आहे. म्हणूनच ही साडी नेसताना मी कारागिरांच्या अविश्रांत मेहनतीप्रती कृतज्ञ आहे. काही गोष्टींचं मोल कशातही चुकविता येत नाही, हेच खरं

आमच्या आयुष्यातील हे क्षण अधिक सुंदर करणाऱ्या सर्व प्रतिभावान विणकरांचा अतिशय अभिमान आहे.” असं सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीतं विणकरांचं कौतुक केलं.

Follow Us
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्या पत्रकार परिषदेत हे काय सांगितलं?
ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोर
Arvinad Swanat | ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोरच...
ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar | ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत...
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह... पहा व्हिडीओ
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...