भाजपने मराठी आंदोलनाचं केवळ राजकारण केलं, संभाजी ब्रिगेडचा आरोप

ईडब्लूएसचं आरक्षण मराठा समाजाने घ्यावं," अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. (Sambhaji Brigade Allegation BJP On Reservation) 

भाजपने मराठी आंदोलनाचं केवळ राजकारण केलं, संभाजी ब्रिगेडचा आरोप

रत्नागिरी : “मराठा आरक्षणासंदर्भात भाजप सरकानं मराठा समाजाची दिशाभूल केली. भाजपने मराठी आंदोलनाचं केवळ राजकारणचं केलं. ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण राहील असं भाजपनं केलं,” अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केली. (Sambhaji Brigade Allegation BJP On Reservation)

“ईडब्लूएसचं आरक्षण मिळावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती. राज्यसरकार एसीबीएसचा कायदा करतंय, तो अधिकार राज्यसरकारला नाही. ओबीसीचा आयोग केवळ शिफारस करु शकतं.  देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली आहे,” असेही प्रवीण गायकवाड म्हणाले. चिपळूणमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.

“50 टक्के आरक्षणामध्ये ओबीसी समाजाला केवळ 19 टक्केच आरक्षण मिळतं. या 19 टक्क्यांमध्ये जर मराठा समाजाला समाविष्ट केलं तर ओबीसी समाजावर अन्याय होईल. त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष 50 टक्के आरक्षणाचं समर्थन करत नाही. यामुळे ईडब्लूएसचं आरक्षण मराठा समाजाने घ्यावं,” अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.

भाजप सरकार मानवताविरोधी

“शेतकरी कायदा रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांचं जोरदार आंदोलन सुरु आहे. भाजप सरकार हे केवळ शेतकरी विरोधी नाही तर मानवताविरोधी आहे,” अशी टीका प्रविण गायकवाड यांनी केली.

भाजपनं व्यापारी उद्योगाला पोषक आणि जागतिकरणाच्या तरतुदीप्रमाणे कायदे केले आहेत. लोकशाहीत लोकांना जर हे कायदे नको असतील, तर या कायद्यांसाठी अट्टाहास का? असा सवाल देखील गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरेल. सरकारला संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने येत्या काही दिवसात उत्तर देऊ, असा सूचक इशारा संभाजी ब्रिगेडने सरकारला दिला आहे. (Sambhaji Brigade Allegation BJP On Reservation)

संबंधित बातम्या : 

देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली, मराठा समाजाने ईडब्लूएसचं आरक्षण घ्यावं : संभाजी ब्रिगेड

शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सचिनचा भारतरत्न पुरस्कार काढून घ्या, संभाजी ब्रिगेड आक्रमक

Published On - 6:39 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI