चुकलो असेल तर दिलगीर आहे, पण दिशाभूल करणं रक्तात नाही; संभाजी छत्रपती रायगडावरून गरजले

खासदार संभाजी छत्रपती यांनी रायगडावरून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. (sambhaji chhatrapati on maratha reservation)

चुकलो असेल तर दिलगीर आहे, पण दिशाभूल करणं रक्तात नाही; संभाजी छत्रपती रायगडावरून गरजले
sambhaji chhatrapati

रायगड: खासदार संभाजी छत्रपती यांनी रायगडावरून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. मी राजकारणी नाही, मी राजकारण करत नाही. पण मधल्या काळात लोक माझ्यावर नाराज झाले. पण मला समाजाला वेठीस धरायचं नाही. धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, असं सांगतानाच चुकलो असेल तर मी दिलगीर आहे, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. (sambhaji chhatrapati on maratha reservation)

348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी ही भूमिका व्यक्त केली. लोकं नाराज झाले तरी चालतील. पण मी समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मी दिलगीर आहे. आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

मी राजकारणी नाही, राजकारण करत नाही

मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही. समाजावर अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जे मी सांगितले तेच भोसले समितीने सांगितलं

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी भोसले समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अहवाल दिला आहे. काही शिफारशी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच भोसले समितीने सांगितल्या आहेत. समितीने काही वेगळं सांगितलं नाही. मी सांगितलेल्या पाच मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करा, समाजाला वेठीस धरू नका, असं आवाहन त्यांनी केलं.

खेळ करू नका

आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

16 जून रोजी पहिलं आंदोलन

छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जून रोजी हे आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाच संभाजी छत्रपती यांनी केली. (sambhaji chhatrapati on maratha reservation)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra News LIVE Update | छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसवरही होणार छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्णक्षण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह, अजित पवारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

मोठी बातमी: विनापरवानगी मोर्चा काढल्याबद्दल विनायक मेटे आणि नरेंद्र पाटलांवर गुन्हा दाखल

(sambhaji chhatrapati on maratha reservation)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI