‘मुसलमान जगात प्रत्येक गोष्ट सहन करू शकतो, मात्र….’, पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर इम्तियाज जलील यांचं वक्तव्य

"मुसलमान जगात प्रत्येक गोष्ट सहन करू शकतो, मात्र आमच्या देवा-धर्माबद्दल बोलणाऱ्यांचे सहन करू शकत नाही. त्यांचे वक्तव्य हे खरंच चुकीचे आहे", अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी मांडली. यावेळी इम्तियाज जलील यांनी सर्व तरुणांना शांत राहण्याचं आवाहन देखील केलं.

'मुसलमान जगात प्रत्येक गोष्ट सहन करू शकतो, मात्र....', पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर इम्तियाज जलील यांचं वक्तव्य
इम्तियाज जलील
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 6:42 PM

महंत रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज छत्रपती संभाजीनगर शहरात बघायला मिळाले. संभाजीनगरमध्ये शेकडो तरुणांचा जमाव आज पोलीस ठाण्याबाहेर जमला. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलकांनी महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पोलीस आयुक्तांकडे महंत रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“संबंधित कार्यक्रम ठेवणाऱ्यांवर आणि बोलणाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी, अशी आम्ही मागणी केली आहे. एक डेलिगेशन घेऊन आम्ही पोलीस आयुक्तांकडे गेलो होतो. आमच्या मनात असलेला राग आम्ही त्यांच्यासमोर व्यक्त केला. मुसलमान जगात प्रत्येक गोष्ट सहन करू शकतो, मात्र आमच्या देवा-धर्माबद्दल बोलणाऱ्यांचे सहन करू शकत नाही. त्यांचे वक्तव्य हे खरंच चुकीचे आहे”, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी मांडली.

“आमच्या मुसलमान बांधवांनी कधीच इतर धर्मियांबाबत असे वक्तव्य केले नाही. या कृत्याबाबत आमच्या समाज बांधवांमध्ये नाराजी आहे. आमचे अनेक धर्मगुरू आज त्यांच्या कृत्यामुळे जेलमध्ये आहेत. मग यांना का सूट देत आहेत? या देशाची शांतता जर टिकवून ठेवायची असेल तर अशा लोकांना प्रतिबंध घालायला हवे”, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.

“नाशिकमध्ये देखील सकल हिंदू समाजाच्या वतीने नमाजच्या वेळेस मोर्चा काढला जात आहे. नंदुरबारमध्ये देखील आज जुम्माच्या दिवशी असे आंदोलन केले जात आहे. जर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतील तर तिथे मुसलमानांवर देखील अत्याचार होत आहेत. मला असं वाटतं ही एक विचार करुन आखलेला कट आहे”, असा दावा जलील यांनी केला.

“आमच्या नबीच्या विरोधात जगातील कुठलाच मुसलमान सहन करू शकत नाही. मी तमाम तरुणांना आवाहन करतो की आपल्या रागाला शांत ठेवा. प्रशासन जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य असेल, अशा भूमिकेत आम्ही आहोत. दुसरे आम्ही असे निवेदन दिले आहे की, अशा काही वेबसाईट चालू आहेत ज्या मुस्लिम धर्माच्या विरोधात आहेत. आम्हाला पोलीस सांगतात, शुक्रवारी तुम्हांला आंदोलन करू देणार नाही मग यांना का परवानगी आहे?”, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला.

“तो नितेश राणे कुठे कुठे जाऊन आंदोलन करत आहे त्यावर का कारवाई करत नाही? जर नियम सर्वांसाठी बरोबर असेल तर त्यांच्यावर का कारवाई होत नाही आणि इम्तियाज जलीलला का तुम्ही थांबवतात? ज्या नाशिकमध्ये आज हे प्रकरण घडलेलं आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री सभा घेत आहेत हे अत्यंत निंदनीय आहे. लोक आता हुशार झाले आहेत. त्यांना सर्व कळतं की यामागे काय काय खेळ असू शकतात, कशाप्रकारे आम्हाला त्यात निशाण्यावर ठेवले जात आहे. मुस्लिम बांधवांनी कशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे, त्यामुळे अशा भूमिका त्यांच्याकडून घेतल्या जात आहेत”, असं इम्तियाज जलील म्हणाले.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.