Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: सिडकोत कुणाचा झेंडा? काँटे की टक्करमध्ये कुणी मारली बाजी, जाणून घ्या एका क्लिकवर

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : सिडको ही उच्चभ्रू वसाहत आहे. या परिसरात डॉक्टर, वकील, उद्योजक, श्रीमंत यांची मोठी संख्या आहेतच, सोबतच आजूबाजूला कामगार वसाहत आहे. दोन वेगवेगळी चित्र या परिसरात दिसतात. येथील मतदार जागरुक तितकाच भावनिक आहे. त्यांचे मत कुणाच्या पारड्यात जाणार हे आज समोर येईल.

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: सिडकोत कुणाचा झेंडा? काँटे की टक्करमध्ये कुणी मारली बाजी, जाणून घ्या एका क्लिकवर
छत्रपती संभाजीनगर महापालिका निकाल
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:24 AM

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: सिडको परिसर ही या शहराची खासियत आहे. या नवीन वसाहतींनी शहराला मोठे वकील, वैद्यकीय तज्ज्ञ, उद्योजक, चांगले पत्रकार, बडे व्यक्तिमत्व दिले आहेत. हा भाग जणू शहराची बौद्धिक बैठक आहे. शहराच्या नियोजनापासून ते विविध क्षेत्रात या भागातील लोकांनी मोठा वाटा उचलला आहे. या भागातील नगरसेवकही अभ्यासू आणि मोठी भूमिका वठवणारे राहिलेले आहेत. या परिसराने शिवसेनाचा झंझावत, भाजपची पाळंमुळं मजबूत करण्यात आणि वंचित पक्षांना, चळवळींना मोठं करण्यात हातभार लावला. आता या प्रभागात कोण बाजी मारेल हे थोड्याच वेळात समजेल.

शहरातील 29 प्रभागात 115 नगरसेवक निवडून येणार आहेत. यावेळी 2015 पेक्षा दोन जागा वाढल्या आहेत. यावेळी शहराच्या राजकारणात दोन पक्षांचा भरणा वाढला आहे. शिंदे सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादीची या राजकारणात एंट्री झाली आहे. तर एमआयएम गेल्या दहा वर्षांपासून शहराच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बदलवत आहेत. यावेळी प्रचारात या मुद्यावर ज्यांनी आश्वासनांचा पाऊस पडला. त्यांचं पारडं जड भरत की, नवीन दमाच्या उमेदवारांना संधी मिळते हे आता समोर आलं आहे.

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

प्रभाग क्रमांक 23

प्रभाग क्रमांक 23 ची लोकसंख्या 46,364 इतकी आहे. जालना रोडच्या पल्याड असलेला भाग, गारखेडा चौकापासून गजानन मंदिर मार्गे सेव्हन हिल चौकापर्यंतचा हा परिसर आहे. यामध्ये सिडको एन-3, एन-4, गुरु सहानी नगर, न्यायमूर्ती नगर, पारिजात नगर, जय भवानी नगर, महाजन कॉलनी, ठाकरे नगर, माया नगर, संत तुकोबा नगर, न्यू. एसटी कॉलनी, सिडको 13 वी स्कीम, पायलेट बाबा कॉलनी, जिजामाता कॉलनी, विश्रांती नगर, गणेशनगरचा भाग आहे.

प्रभाग क्रमांकविजयी उमेदवारपक्ष

प्रभाग क्रमांक 24

प्रभाग क्रमांक 24 ची लोकसंख्या 45,688 इतकी आहे.या प्रभागात महालक्ष्मी नगर, संतोषी माता नगर, मुकुंदवाडी, राजीव गांधी नगर, न्यू एस.टी. कॉलनी, मुकुंदवाडी गाव, लघुवेतन कॉलनी, जयश्री कॉलनी, शिवाजी कॉलनी, देवगिरी कॉलनी, सिडको, ज्ञानेश्वरी कॉलनी, सिडको जे सेक्टर रोहिदास नगर, सिडको एन-2 भाग, एसटी कॉलनी, संघर्ष कॉलनी, बंजारा कॉलनी, रामनगरचा काही भाग यामध्ये येतो.

प्रभाग क्रमांक 25

या प्रभागाची लोकसंख्या 39,847 इतकी आहे. या प्रभागात रामनगर, प्रकाश नगर, तानाजी नगर, संघर्ष नगर, श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी, सदाशिव नगर, तोरणागड कॉलनी, शाहुनगर, कामगार कॉलनी,पुष्पक गार्डनर, जय भारत कॉलनी, चिकलठाणा गाव, बोद्धवाडा, मोतिवाला नगर, हनुमान नगर चौकचा यात समावेश आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE