AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मुंबईला जायचंच; मनोज जरांगे यांचा पदयात्रेचा मार्ग ठरला; जरांगेंचं मराठा आंदोलकांना महत्वाचं

Manoj Jarange Patil on Mumbai Daura For Maratha Reservation : पीठ, सरपण, चुली सारं सोबत घ्या, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मनाठा आंदोलकांना केलं आहे. काहीही झालं तरी मुंबईत येऊन आंदोलन करायचंच, असा निर्धार मनोज जरांगे यांनी केलं आहे. जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा...

आता मुंबईला जायचंच; मनोज जरांगे यांचा पदयात्रेचा मार्ग ठरला; जरांगेंचं मराठा आंदोलकांना महत्वाचं
manoj jarange
| Updated on: Dec 28, 2023 | 12:47 PM
Share

दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 28 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा राहिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करण्यात इशारा दिला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी या आंदोलनावर भाष्य केलं आहे. मराठा आंदोलकांना त्यांनी आवाहन केलं आहे. जालन्यातील अंतरवली सराटी ते मुंबई अशी ही पदयात्रा असेल. विविध गावांमधून प्रवास करत मराठा आंदलोकांसह मनोज जरांगे मुंबईत दाखल होतील. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे.

जरांगेंचं आंदोलकांना आवाहन

रोज वापरासाठी लागत असलेल्या वस्तू सोबत घेण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी आंदोलकांना केलं आहे. मुंबईत जाईपर्यंत जेवणाची व्यवस्था करावी लागणार नाही. मात्र तिथं गेल्यावर आपल्याला आपलं सामान बाहेर काढावं लागेल. शक्य असेल तर पाण्याचे टँकर, रुग्ण वाहिका सोबत घ्या. पीठ, सरपण, चुली, बादल्या, ताटं, तांब्या, कपडे चटई हे सगळं सोबत घ्या. रिक्षा, चारचाकी गाडीमधील मागील सिट काढून घ्या आणि झोपायची व्यवस्था करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे.

सारे सारे या… – जरांगे

भजन करणाऱ्या मंडळींनी, टाळकरी मंडळी यांनी यावं ही विनंती आहे. गावगावांतील हलगी पथक, गावागावातील गणपती मंडळाचे ढोल घ्यावेत. पोवाडे म्हणणारे, शिवशाहीर किंवा शिकणारे शिवशाहीर असतील तर ना नफा न तोटा तत्त्वावर यावे मनोबल वाढविण्यासाठी यावं. जागरण गोंधळ करणारे, भरुडकार यांनी सोबत यावे, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय. जो हॉटेल चालक ना तोटा ना नफा या तत्त्वावर कुणी स्टॉल टाकत असेल तर चालेल. सरकारने फक्त आंघोळीची आणि प्रातविधीची सोय करावी, असं जरांगे म्हणालेत.

हरिभाऊ राठोड यांनी अर्ध वाचलंय. त्यांच्या आरक्षणामुळे आम्हाला अर्धा आरक्षण मिळत आहे. पूर्ण वाचल्यानंतर सांगू. पक्कं झाल्याशिवाय त्यांनी गडबड करू नये. त्यांच्या फोर्मुल्यावर सगळ्या मराठ्यांचा कल्याण होईल असं वाटत नाही, असंही जरांगेंनी म्हटलंय.

सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.