AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री हातावर मेहंदी काढली, सकाळी आईचा मृतदेह पाहून मुलीचीही विहिरीत उडी, अंत्यविधीसाठी निघालेल्या भावाचाही अपघात

आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पाहताच मुलीनेही विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. यामुळे दुधारे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

रात्री हातावर मेहंदी काढली, सकाळी आईचा मृतदेह पाहून मुलीचीही विहिरीत उडी, अंत्यविधीसाठी निघालेल्या भावाचाही अपघात
| Updated on: Sep 06, 2024 | 10:09 AM
Share

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case : आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच मुलीनेही विहिरीत उडी मारत आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे या दोन्ही मायलेकींचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात ही घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. आई आणि बहिणीच्या निधनाचे वृत्त समजताच अंत्यविधीसाठी निघालेल्या भावाचाही अपघात झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील गल्ले बोरगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पाहताच मुलीनेही विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. यामुळे दुधारे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुधारे कुटुंब हे शेतात राहत होते. पल्लवीने रात्री सर्व कामे आटपल्यानंतर आईच्या हातावर मेहंदी काढली. यानंतर त्या दोघीही झोपल्या.

आईचा मृतदेह पाहून मुलीचीही विहिरीत उडी

यानंतर सकाळी उठल्यानंतर पल्लवीला तिची आई वंदना कुठेही दिसली नाही. तिने आजूबाजूला शोधाशोध केली. यानंतर ती आईला शोधण्यासाठी विहिरीजवळ गेली. त्यावेळी तिला आईचा तरंगलेला मृतदेह दिसला. यानंतर तिने कोणताही विचार न करता स्वत: विहिरीत उडी मारत आत्महत्या केली. वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे या दोन्ही मायलेकींचे नाव आहे.

अंत्यविधीसाठी निघालेल्या भावाचाही अपघात

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आई आणि बहिणीच्या निधनाचे वृत्त समजताच भाऊ वाल्मीक जनराव हे त्यांच्या पत्नीला घेऊन अंत्यविधीसाठी निघाले होते. मात्र रस्त्यात त्यांचाही अपघात झाला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान वंदना दुधारे आणि पल्लवी दुधारे यांनी आत्महत्या का केली? त्यामागचे कारण काय? याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या मायलेकींच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Follow Us
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न.
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप.
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन.
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार...
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार....
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना.
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने.
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?.
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच.
मुस्लीम तरुणाकडून हिंदू नाव वापरुन 29 वर्षीय तरुणीची फसवणूक
मुस्लीम तरुणाकडून हिंदू नाव वापरुन 29 वर्षीय तरुणीची फसवणूक.
भोंदू अशोक खरातचा पाय खोलात, नाशिकमधील घरी आयकर विभागाकडून छापेमारी
भोंदू अशोक खरातचा पाय खोलात, नाशिकमधील घरी आयकर विभागाकडून छापेमारी.