Chhatrapati Sambhajinagar Graduates: ‘मी 18 वर्षांचा दुष्काळ संपवला’, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात कुणी गेम फिरवला? सतीश चव्हाणांना मोठा धक्का
Chhatrapati Sambhajinagar Graduates: छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मोठा उलटफेर झाला. विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच गुलाल उधळायला सुरूवात केली आहे.

Raviraj Sable Patil Reaction: छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदारसंघात निकालापूर्वीच गुलाल उधळला गेला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांच्याविरोधातील नाराजी मतपेटीतून बाहेर पडली आहे. तर महायुतीमधील नाराजीचाही फटका त्यांना सहन करावा लागला आहे. दरम्यान उमेदवार रविंराज साबळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मी 18 वर्षांचा दुष्काळ संपवला
माझ्या दुसर्या पसंतीच्या मतावर विजयी उमेदवार ठरणार, मी 18 वर्षांचा दुष्काळ संपवलाय अशी प्रतिक्रिया रविराज साबळे यांनी दिली. मराठवाडा पदवीधर निवडणुक मतमोजणी सुरू आहे. महाविकास आघाडीचे प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत तर महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण पिछाडीवर आहेत. तिसर्या क्रमांकवर असलेल्या अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांनी अशी खणखणीत प्रतिक्रिया दिली आहे.
मी प्रस्थापित नाही तरीही आतापर्यंत मला 20,450 मतदान मिळाले आहे. पण माझ्या मतावर या दोघांचे भवितव्य अवलंबून आहे, माझ्या दुसर्या पसंतीच्या मतावर विजयी उमेदवार ठरणार आहे. मी आठरा वर्षांचा दुष्काळ संपवलाय अशी रविराज साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साबळे हे मराठवाडा पदवीधर निवडणुक अपक्ष उमेदवार आहेत. ते उद्यमशील शेतकरी आणि सोशल मीडियावरही सक्रीय आहेत.
प्रतापसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गुलाल उधळला. 13160 मताने आघाडीवर असल्याने गुलाल उधळत घोषणाबाजी करण्यात आली. दुसर्या पसंतीची मते मोजली जात आहेत. पाटील यांना अद्यापही लीड कायम आहे. 100 मीटरच्या बाहेर घोषणाबाजी करावी आत येऊ नये अशा निवडणूक आयोगाकडुन कार्यकर्त्यांना सूचना करण्यात आली आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ : तिसऱ्या फेरीअखेरची मतमोजणी आकडेवारी
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीअखेर एकूण 1,93,655 मतपत्रिकांची मोजणी झाली. त्यापैकी 1,77,115 मते वैध, तर 16,540 मतपत्रिका हस्तांतरणास अपात्र ठरल्या आहेत. विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा 88,558 निश्चित झाला आहे.
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना 73,931 सतीश भानुदासराव चव्हाण यांना 60,768 तर रविराज उर्फ अण्णासाहेब साबळे-पाटील यांना 19,835 मते मिळाली आहेत. कोणत्याही उमेदवाराने आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केलेला नसून पुढील पसंतीक्रमानुसार दुसऱ्या क्रमांकाची मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.