अंतरवलीत जाणार, घरी जाणार नाही, दिवाळीही साजरी करणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

मी कुटुंब प्रमुख नाही. मी आंदोलनात आहे. मी घरातील लोकांना फोन केला नाही. त्यांनी आणावं इथून तिथून आणि करावी दिवाळी. पण तुम्हाला सांगतो माझं कुटुंबही दिवाळी करणार नाही. करोडो मराठ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. त्यामुळे घरचेही दिवाळी करणार नाहीत. दिवाळी साजरी करून काय होणार आहे? एक दिवसाचा आनंद आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांना कायमची भाकरी देण्यासाठी ही लढाई आहे. एक दिवसाचा आनंद व्यक्त करण्यासाठी नाही.

अंतरवलीत जाणार, घरी जाणार नाही, दिवाळीही साजरी करणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 12, 2023 | 11:02 AM

दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 12 नोव्हेंबर 2023 : मला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतोय. मी आज जालन्यातील अंतरवली सराटीत जाणार आहे. गावात जाईल. पण घराचा उंबरठा ओलांडणार नाही. जोपर्यंत मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी घराच्या उंबऱ्यावर पाय ठेवणार नाही, असं सांगतानाच यंदा मी दिवाळीही साजरी करणार नाही. माझ्या बांधवांनी आत्महत्या केलेल्या असताना आणि त्यांच्या घरात अंधार पसरलेला असताना मी दिवाळी कशी साजरी करू?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि समाजाची एकजूट करण्यासाठी 15 ते 23 तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण आणि परत मराठवाडा अशा माझ्या गाठीभेटी असणार आहेत. माझी तब्येत ठणठणीत आहे. आता मी अंतरवलीला निघालोय. पण घराकडे जाणार नाही. दिवाळी साजरी करणार नाही. मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या, दु:खाचं सावट आहे. त्यामुळे आनंद कसा साजरा करणार? त्यामुळे वैयक्तिक दिवाळी साजरी करणार नाही. डिस्चार्ज आज होणार आहे. पण रात्रीच आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबातील लोकांना भेटून आलो, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

सरकारवर दबाव नाही

सरकारशी बोलतोय. सरकार आमच्याशी बोलत आहे. आमचा सरकारवर काहीच दबाव नाही. मी शांततेत गाठीभेटी घेत आहे. लोकांचे आशीर्वाद घेत आहे. या पलिकडे काही नाही. कोण उद्रेक करणार हे सरकारला माहीत आहे. साखळी उपोषण हे शांततेचं अस्त्र आहे. जगात तेच वापरलं जातं. जर त्याला सरकारचा किंवा कुणाचा आक्षेप असेल तर त्याएवढं दु:ख नाही, असं सांगतानाच मुख्यमंत्री कार्यालयाने अंतरवलीला जाण्याच्या आत पत्र देऊ किंवा तिथे गेल्यावर देऊ असं म्हटलंय. अंतरवलीत मी दोन दिवस आहे. दोन दिवसानंतर बघू, असं जरांगे पाटील म्हणाले.

तुमच्या पायाला हात लावून…

कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे. त्यामुळे आत्महत्या करू नका. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळेल. सर्वांना प्रमाणपत्र मिळत आहे. दोन चार दिवस लेट मिळतील. पण आत्महत्या करू नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो. आता ऐका. सर्वांना प्रमाणपत्र मिळत आहे. तुम्हालाही मिळणार आहे. सर्वांनी आणखी आरक्षण मिळण्यासाठी कामाला लागा, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.