2029 मध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार? एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने आताच उघडले पत्ते, त्या एका वाक्यानं राजकीय भूकंप?
Sanjay Shirsat Big Statements: महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती असल्याचा दावा करण्यात येतो. पण एकत्र शिवसेना असताना अनेकदा दोघांचे भांड्याला भांडे वाजलेच नाही तर दोन्ही पक्ष टोकाची भूमिका घेत वेगळे लढले. आता शिंदे सेनेच्या नेत्याने पुन्हा मोठे विधान केले आहे.

Sanjay Shirsat Big Statements: राज्यात 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. त्याच्याअगोदरपासून दोघांची युती होती. त्यानंतरही ही युती अनेक वर्षे कायम होती. पण 2014 नंतर भाजप आक्रमक झाला. भाजपचे संख्याबळ वाढले. शिवसेना आणि भाजपचे जागा वाटपात बिनसले आणि नैसर्गिक युती तुटली. पुढे एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत महायुती सरकार आणले. 2024 मध्ये थोडे रुसवे फुगवे होत महायुती म्हणून विधानसभा लढवली. भाजपने चमत्कार दाखवला. पण 2029 मधील विधानसभा निवडणूक महायुती म्हणून हे पक्ष एकत्र लढतील का अशी शंका एका विधानाने समोर आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराने मोठे वक्तव्य केले आहे.
भाजप किंवा शिवसेना स्वतंत्र लढू शकते
एकनाथ शिंदे यांचे शिलेदार, मंत्री आणि पक्ष प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठे वक्तव्य केले आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करीत असतो. 2029 मध्ये भाजप किंवा शिवसेना स्वतंत्र लढू शकते. काही कोणाला थांबवले नाही. शिवसेना भाजप युती तुटताना पाहिलेलं आहे, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करतील हे स्वप्न आहे. ते स्वप्नात आहे. आम्ही स्वप्नात नाही असे सांगत त्यांनी मोठे संकेत दिले आहेत.
कधीही कुणाचेही कोणतेही शाश्वत राजकारण नसते. अनेक युती अशा झाल्या की, कधी स्वप्नातही त्या होऊ शकत नाही. आपला पक्ष मजबूत करणे हा सर्वात मोठा उपाय आहे. आमची भूमिका महायुती सोबत लढायची, ताकद विभागाला नको, असे शिरसाट म्हणाले. पण ताकद वाढवायला शिंदे सेनेने सुरुवात केल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
बच्चू कडूंचा निर्णय योग्य
सामना अग्रलेखावर त्यांनी भाष्य केले. बच्चू कडू यांनी शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतलेला निर्णय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करताना त्यांना कल्पना आहे. राजकारणाची दिशा काय असेल म्हणून. यांनी काँग्रेस बरोबर केलेला घरोबा ती आत्महत्या नव्हती का? असा सवाल शिंदेंनी केला.
कटू निर्णय घ्यायचा ते शिंदे घेतील
पश्चिम महाराष्ट्रातील पक्षातील वादळावरही त्यांनी भाष्य केले. महेश शिंदे यांनी भाजप बरोबर सत्ता मिळविण्यासाठी जो प्रकार केला तो शिंदे साहेबांन मान्य न्हवता, मात्र शिंदे यांच्यावर निर्णय घेतील. त्याचा विरोधक आहे म्हणजे प्रवेश द्यायचा नाही असे नाही. देसाई यांनी शिंदे यांना विचारूनच निर्णय घेतला असावा. शिंदे यांचा निर्णय जाहीर करतील. घरातील भांडण कोणत्या स्तरावर गेले मला माहिती नाही. मात्र भांडण मिटविण्यासाठी पुढील आठवड्यात बोलावले जाईल काही कटु निर्णय घ्यायचा ते शिंदे ठरवतील. काही नेत्यांची वैयक्तिक ताकद असते, असे शिरसाट म्हणाले.
सामंत जरांगे भेटीवर केले भाष्य
मनोज जरांगे पाटील यांना विधानपरिषदेच्या उमेदवारी द्यायची असे नाही. हे बोलणे चुकीचे आहे. मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. मात्र सध्या निवडणूकही नाही. ती वैयक्तिक भेट होती. बच्चू कडू हे 2022 पासून आमच्या सोबत आहे. शिंदेवर त्यांचा विश्वास आहे. विदर्भातील चांगला जुना शिवसैनिक आणले. लक्ष्मण हाके, जरांगे पाटील या कल्पित बातम्या आहेत. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका शिंदे यांची आहे. महाराष्ट्रात सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची टाकत फक्त शिंदे मध्ये आहे, असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले.