AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समाजसेवेचा बुरखा पांघरून…. सामनातून बच्चू कडूंवर कडाडून ‘प्रहार’, भाजप कोणता पक्ष गिळणार? मोठे भाष्य

Bachchu Kadu in Shivsena: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते अधिकृत प्रवेश केला. त्यांचे विधान परिषदेचे तिकीटही कन्फर्म झाले. या राजकीय घडामोडींवर सामनातून 'प्रहार' करण्यात आला. तर भाजप कोणता पक्ष गिळणार यावरही भाष्य केले.

समाजसेवेचा बुरखा पांघरून.... सामनातून बच्चू कडूंवर कडाडून 'प्रहार', भाजप कोणता पक्ष गिळणार? मोठे भाष्य
बच्चू कडूंवर सामनातून कडाडून प्रहारImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 02, 2026 | 9:25 AM
Share

Bachchu Kadu in Shivsena: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू हे पुन्हा एकदा शिवसेनेत दाखल झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. त्यांचे विधान परिषदेचे तिकीटही निश्चित झाले. या राजकीय रणधुमाळीने दोघांना काय फायदा होईल याची चर्चा रंगली असतानाच शिंदेंनी बच्चू कडूंचा पक्ष गिळल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर आजच्या सामना मधून या राजकीय घडामोडींवर जोरदार प्रहार करण्यात आला. त्याचबरोबर भाजप हा भविष्यात कोणते पक्ष गिळणार याविषयी मोठे भाष्य करण्यात आले.

भाजप स्वबळावर निवडणूक लढणार

भाजप भविष्यात निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे सामनाच्या अग्रलेखातून दावा करण्यात आला. भाजप अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ठोकर मारण्याच्या तयारीत असल्याचा दावा या सामनातून करण्यात आला. तर अजितदादांचा पक्ष गिळण्याची तयारी झाल्याचा दावाही अग्रलेखातून करण्यात आला आहे. उद्या एकनाथ शिंदेंचे शिलेदारही भाजपमध्ये जातील असा दावा सामनातून करण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा सामनातून अशाच प्रकारची टीका करण्यात आली होती. यावेळी राजकीय समीकरणं बदलत असताना अग्रलेखातून पुन्हा राजकीय भाष्य करण्यात आले आहे.

मिंधे गटात विलीन होऊन कडूंची जिवंत समाधी

कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचं ढोंग असल्याचा प्रहार सामनातून करण्यात आला आहे. उद्या मिंध्यांचे आमदारही भाजपमध्ये जातील.मिंधे रिकामे होतील. तेव्हा समाधी अवस्था सोडून कडू महाराजासारखे लोक भाजपचा भंडारा उधळतील. कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचं ढोंग आहे. उद्या कडू हे फडणवीस, मोदींचा जय करीत दिव्यांगांच्या न्यायासाठी भाजपच्या गाडीस लटकण्याचा प्रयत्न करतील. हे घसरलेल्या राजकीय पातळीचे चित्र आहे. विधान परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठप्राप्तीस निघाले आहेत. तर दिव्यांग, शेतकरी, विधवा मात्र जेथे होत्या तिथेच आहेत, असे शा‍ब्दिक फटकारे या अग्रलेखातून लगावण्यात आले आहेत.

कडू यांनी स्वतःला मिंधे गटात विलीन करून जिवंत समाधी घेतली. या सोहळ्याला मिंधे व कडू यांचे अनुयायी हजर होते. त्यातूनच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. त्यामुळेच कडू यांना समाधी अवस्थेत देव दिसला असा प्रहार सामनातून करण्यात आला. विधानसभा निवडणूक हरल्यापासून कडू हे पाण्याबाहेर पडलेल्या माशाप्रमाणे तडफताना दिसले. एका सामाजिक कार्यकर्त्याची ही तडफड समाजाला अस्वस्थ करणारी असल्याची शेलकी टीकाही सामनातून करण्यात आली. हा सेवाभावी कार्यकर्ता सुरत, गुवाहाटी, गोवा अशी तीर्थयात्रा करून महाराष्ट्रात परतला आणि सरकार दरबारी फिरत राहिला. कडू हे समाजसेवेचा बुरखा पांघरून राजकारण करणारे व स्वार्थ साधणारे व्यक्तिमत्व असल्याची जहरी टीकाही करण्यात आली आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना