AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुसतं बोलण्यापेक्षा आरक्षणाच्या प्रश्नाला दिशा द्या, नंतर काय ते राजकारण करत बसा- संभाजीराजे

आजच्या मराठा ठोक क्रांती मोर्चाला लोकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती.

नुसतं बोलण्यापेक्षा आरक्षणाच्या प्रश्नाला दिशा द्या, नंतर काय ते राजकारण करत बसा- संभाजीराजे
| Updated on: Oct 09, 2020 | 2:40 PM
Share

सोलापूर: राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं नुसतं बोलण्यापेक्षा या सगळ्याला दिशा द्यावी. नंतर तुम्हाला जे राजकारण करायचेय ते करत बसा, अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकासआघाडी सरकारला फटकारले. तसेच आता सकल मराठा समाजाचा आवाज महाराष्ट्रात घुमायला पाहिजे. तो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले. (Chatrapati Sambhaji Raje on Maratha reservation)

ते शुक्रवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चात बोलेत होते. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांवर टीकास्त्र सोडले. केंद्र आणि राज्य सरकारला मराठा आरक्षणाची कोणतीही पर्वा नाही.

आरक्षण सोडा पण 2014 पासून आजपर्यंत सरकारने मराठा समाजाचे बाकीचे प्रश्न तरी सोडावलेत का? महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ३२ टक्के आहे. मग त्यांना मदत का केली गेली नाही? मराठा समाजातील तरुणांना घडवणाऱ्या सारथी संस्थेची स्वायत्तता मोडीत काढण्यात आली? नुसता जीआर काढून किंवा महामंडळांसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून काही होत नाही, असा टोलाही संभाजीराजे यांनी सरकारला लगावला.

तसेच मला कोणत्याही पक्षाशी देणेघेणे नाही, मी राष्ट्रपतीनियुक्त खासदार आहे. गेल्या सरकारच्या काळापासून मी याच गोष्टी बोलत असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. आता मराठा समाजाने सर्व गोष्टींचा अभ्यास करायला शिकले पाहिजे. मागच्या आणि आताच्या सरकारने मराठा समाजाला जाहीर केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात दिल्या का? नुसते आकडे नको, सरकारने प्रत्यक्षात मदत दिली पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

तत्पूर्वी सोलापुरातील आजच्या मराठा ठोक क्रांती मोर्चाला लोकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. या आंदोलकांकडून उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधा घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टातून स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज पेटून उठला आहे. त्यामुळे आता या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या भाषणादरम्यान आंदोलकांना कोणतीही जाळपोळ किंवा नासधूस न करण्याचे आवाहनही केले.

संबंधित बातम्या:

‘प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद’, राजेंवरील टीकेनंतर मराठा क्रांती मोर्चात संताप, तुळजापुरात घोषणाबाजी

‘मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संविधान दुरुस्ती करुन वटहुकूम काढावा’

शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं, आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? : संभाजीराजे

(Chatrapati Sambhaji Raje on Maratha reservation)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.