कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, हा कुठला न्याय ? उदयनराजे यांच्यानंतर संभाजीराजेही संतापले…

पुणे येथे आज राज्यपाल यांचा दौरा होता, त्याच दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला होता.

कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, हा कुठला न्याय ? उदयनराजे यांच्यानंतर संभाजीराजेही संतापले...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 3:32 PM

कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राज्यातील वातावरण चिघळण्याच्या मार्गावर आहे. उदयन राजे यांनी थेट मुंडकी उडवण्याची भाषा केली आहे. तर दुसरींकडे सांविधानिक पद्धतीने राज्यपाल यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी गेलेल्या स्वराज्याच्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याने संभाजीराजे छत्रपतीही संतापले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत आक्रमक भूमिका मांडली आहे. ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी म्हंटले आहे, राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक ! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा ! हा कोणता न्याय ? “स्वराज्य”चे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे भगतसिंग कोश्यारीला काळे झेंडे दाखवले..म्हणून स्वराज्य च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, मग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत ? आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अवमान करून कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संविधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलिस कारवाई करतात. हा कुठला न्याय आहे ? अशा आशयाचे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.

पुणे येथे आज राज्यपाल यांचा दौरा होता, त्याच दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला होता.

हे सुद्धा वाचा

राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचचा या घोषणेखाली निषेध व्यक्त करत असतांना स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

एकूणच याच मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत या कारवाईचा एकप्रकारे निषेध व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित करत राज्यपाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्यपाल यांच्या विधानावरून दोन्हीही राजे आक्रमक झाल्याने राज्यातील वातावरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे राज्यपाल यांना पदमुक्त करतात का ? की राज्यपाल माफी मागतात ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.