AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला खिंडार, आधीच 82 जणांचा राजीनामा, त्यात कोकणातील बडा नेता शिंदेंच्या संपर्कात

कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असून कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 'कणकवली पॅटर्न'मुळे चर्चेत आलेले पारकर आता मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाला खिंडार, आधीच 82 जणांचा राजीनामा, त्यात कोकणातील बडा नेता शिंदेंच्या संपर्कात
uddhav thackeray eknath shinde
| Updated on: May 06, 2026 | 10:44 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाचे केंद्र राहिलेल्या कोकणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. ठाकरे गटाचे आक्रमक नेते माजी जिल्हाप्रमुख आणि कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर हे लवकरच शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. या वृत्ताला स्वतः संदेश पारकर यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘कणकवली पॅटर्न’चा शिल्पकार आता सत्ताधाऱ्यांच्या गोटात

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत संदेश पारकर यांनी कणकवली पॅटर्न राबवला होता. हा पॅटर्न संपूर्ण राज्यात गाजला होता. कोणत्याही एका पक्षाच्या झेंड्याखाली न राहता, सर्वपक्षीय संमतीने त्यांनी नगराध्यक्षपद मिळवले होते. या प्रयोगाला तत्कालीन महाविकास आघाडीसह स्थानिक नेत्यांनीही पाठिंबा दिला होता. मात्र, आता हाच पॅटर्न आता शिंदे सेनेच्या बळकटीसाठी वापरला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोकण हा नेहमीच शिवसेना ठाकरे गट बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, गेल्या काही काळापासून कोकणातील एकामागून एक बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत. संदेश पारकर हे केवळ एक नगराध्यक्ष नसून त्यांचा कणकवली आणि परिसरात मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या जाण्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि विधानसभा क्षेत्रात ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.

का घेतला पक्षबदलाचा निर्णय?

संदेश पारकर हे मतदारसंघातील रखडलेली विकासकामे आणि नगरपंचायतीला आवश्यक असलेला निधी मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाण्याचा विचार करत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत आणि कोकणासाठी त्यांनी जाहीर केलेले विशेष प्रकल्प यामुळे ते प्रभावित झाले आहेत. त्यामुळे ते प्रवेश घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

परभणीत तब्बल ८२ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

दरम्यान परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवल्याच्या निषेधार्थ तब्बल ८२ पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत. शिवसेना भवन येथील बैठकीला गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत आनेराव यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या समर्थनात एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

येत्या आठ दिवसांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय मागे न घेतल्यास प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. खासदार संजय जाधव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आनेराव यांच्यावरील कारवाईमुळे निर्माण झालेला हा पेच सोडवण्यासाठी ठाकरे काय पावले उचलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी