VIDEO | ‘लक्ष्मी’ जन्माचे अनोखे स्वागत, शेतकऱ्याच्या पोराने लेकीला माप ओलांडून घरात आणले

VIDEO | 'लक्ष्मी' जन्माचे अनोखे स्वागत, शेतकऱ्याच्या पोराने लेकीला माप ओलांडून घरात आणले
महेश आणि ज्योती लाड यांचं स्तुत्य पाऊल

स्त्रियांना सन्मानजनक वागणूक देण्याची सुरुवात स्वतःपासून करत त्यांनी आपल्या नावापुढे वडिलांसोबतच आईचेही नाव 'महेश सुलभा संजय लाड' असे लावले. (Sangli Couple welcomes baby girl)

अनिश बेंद्रे

|

May 26, 2021 | 2:53 PM

सांगली : मुलीच्या जन्मानंतर तोंड पाडणारे एकीकडे असताना सांगलीतील तरुण दाम्पत्याने आपल्या घरी आलेल्या लक्ष्मीचे स्वागत माप ओलांडून गृह प्रवेशाने केले. पलुस तालुक्यातील कुंडल येथील महेश आणि ज्योती लाड यांनी आपल्या चिमुकलीला जल्लोषात घरी आणले. लाड दाम्पत्याने अडचणीच्या काळात सकारात्मक विचारांचा संदेश दिला आहे. (Sangli Couple welcomes baby girl with rituals)

महेश-ज्योती यांना कन्यारत्नाचा लाभ

कोरोनामुळे सर्वत्र नकारात्मक आणि निराशावादी चित्र असताना पलुस तालुक्यातील पुरोगामी विचाराच्या महेश लाड आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुलीच्या जन्माचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले. कुंडल येथील प्रगतशील शेतकरी कै. महादेव लाड आणि सुशिला लाड यांचे सुपुत्र महेश लाड या युवकाचा विवाह बेंद्री (तासगाव) येथील बाळासाहेब श्रीरंग शिंदे आणि वनिता शिंदे यांच्या ज्येष्ठ कन्येसोबत 2013 मध्ये झाला. त्यांना पाच वर्षांचा मुलगाही आहे. कोरोनाच्या काळातच महेश-ज्योती यांना कन्यारत्नाचाही लाभ झाला. बाहेरील वातावरणामुळे घाबरुन न जाता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली.

महेश लाड हे पुणे येथे नोकरीला आहेत. नोकरी करतानाच पुण्यासारख्या शहरात वेगवेगळ्या कारणाने राहत असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील लोकांच्या “आम्ही सांगलीकर” आणि स्वराज्य संग्राम या ग्रुपच्या माध्यमातून ते अडीअडचणी सोडवत, विविध सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपत असतात. तर ज्योती लाड या स्नेहबंध नावाने विवाह संस्था चालवतात. महेश लाड यांनी पुणे येथील लहान व्यापारी आणि व्यावसायिकांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी पुरुष बचत गटाचीही स्थापन केली आहे.

आईचेही नाव लावणारा महेश सुलभा संजय लाड

मुलगी म्हटलं की आजही समाजात अनेकांच्या कपाळाला आठ्या पडतात. आजही नवजात अर्भके वाऱ्यावर सोडली जातात, त्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे. समाजाचा मुलींच्या बाबतीतला नकारात्मक दृष्टीकोन बदलून सकारात्मकता यावी यासाठी महेश लाड यांनी स्वतःच्या जडणघडणीमध्ये वडिलांइतकाच आईचाही वाटा असल्याचा संदेश दिला आहे. स्त्रियांना सन्मानजनक वागणूक देण्याची सुरुवात स्वतःपासून करत त्यांनी आपल्या नावापुढे वडिलांसोबतच आईचेही नाव ‘महेश सुलभा संजय लाड’ असे लावले.

अंगणात रांगोळीसह फुलांचा गालिचा

हा पुरोगामी विचार जपणाऱ्या महेश यांनी आपल्या मुलीच्या जन्मानंतर तिला सजवलेल्या गाडीतून घरी आणले. अंगणात रांगोळीसह, फुलांचा गालिचा अंथरला होता. तर संपूर्ण घर फुलांच्या माळांनी सजवले होते. सर्वसाधारणपणे आपल्याकडे मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी भरलेले माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश करते. आपल्या संस्कृतीनेही मुलीला “लक्ष्मी” मानले असून तोच दृष्टीकोन समोर ठेवून या उभयतांनी मुलीचा प्रवेशही माप ओलांडून केला. मुलगी नको म्हणणाऱ्या लोकांच्या डोळ्यात लाड कुटुंबियांनी झणझणीत अंजन घातले आहे. (Sangli Couple welcomes baby girl with rituals)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत

Nagpur | चिमुकलीचं अनोख्या पद्धतीनं स्वागत, मुलगी झाल्याचा आनंद साजरा

(Sangli Couple welcomes baby girl with rituals)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें