AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शेकडो शिवसैनिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

Uddhav Thackeray Shivsena: सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला राष्ट्रवादी अजित पवार गटाने धक्का दिला आहे. मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत शेकडो शिवसैनिकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शेकडो शिवसैनिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 24, 2025 | 8:31 AM
Share

Uddhav Thackeray Shivsena: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अनेक धक्के बसत आहे. पक्षाला सुरु असलेली गळती थांबत नाही. नाशिक आणि पुणे येथील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सोमवारी प्रवेश घेतला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता. तसेच कोकणातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधवही नाराज आहेत. त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. आता सांगलीमधून उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. मिरज शहर प्रमुखासह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

कट्टर शिवसैनिकाने सोडली साथ

सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला राष्ट्रवादी अजित पवार गटाने धक्का दिला आहे. मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत शेकडो शिवसैनिकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीमध्ये मिरजेमध्ये पक्ष प्रवेश पार पडला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून चंद्रकांत मैंगुरे यांची ओळख आहे. त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील पक्ष प्रवेशामुळे मिरजेतील शिवसेनेला खिंडार पडले आहे.

सांगलीत जैन समाजाचे नेते भाजपमध्ये

सांगलीतील जैन समाजाचे नेते आणि दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात 12 वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबईमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश पार पडणार आहे.

रावसाहेब पाटील हे जैन समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य असून सांगली जिल्ह्यातील समाजाचे नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्याबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील जैन समाजाच्या सर्वात मोठी संघटना असणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष देखील ते आहेत. सामाजिक कार्याबरोबर शैक्षणिक व सहकार क्षेत्रामध्ये रावसाहेब पाटील यांचे मोठे कार्य आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.