आई नेक बाप एक, राऊतांच्या त्या टीकेवर संजय देशमुखांचे सडेतोड उत्तर, त्यांच्या बोलण्यामुळेच…
उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये सभा घेतली. लोक त्यांच्यासोबत असते तर त्या सभेला मोठी गर्दी झाली असती. त्यांच्या सभेला आलेले लोक वणी मतदारसंघातले होते. ते यवतमाळ लोकसभा मतदारसंघातले नव्हते, असा दावा त्यांनी केला.

Sanjay Deshmukh : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरांमध्ये यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांचाही समावेश आहे. या बंडखोरीनंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना जागवण्यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरत आहेत. ज्या-ज्या मतदारसंघात बंडखोरी झालेली आहे, त्या प्रत्येक मतदारसंघात जाऊन ठाकरे कार्यकर्ते, जनतेशी संवाद साधत आहेत. ठाकरे यांनी संजय देशमुख यांच्या मतदारसंघात जाऊन बंडखोर खासदारांवर सडकून टीका केली. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनीही संजय देशमुखांवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, आता याच टीकेवर संजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर हल्लाबोल केला.
विकासाच्या मुद्द्यावर बंडखोरीचा निर्णय
त्यांनी जी टीका केली त्याला काही अर्थ नाही. आम्ही सहा खासदारांनी विकासाच्या मुद्द्यावर हा निर्णय घेतला. ज्या आशेने, अपेक्षेने आम्हाला लोकांनी निवडून दिलेले आहे, ते लक्षात घेऊनच आम्ही निर्णय घेतला. लोकांना विश्वासात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे.
संजय राऊत वायफळ बोलतात
त्यांनी यवतमाळमध्ये सभा घेतली. लोक त्यांच्यासोबत असते तर त्या सभेला मोठी गर्दी झाली असती. त्यांच्या सभेला आलेले लोक वणी मतदारसंघातले होते. ते यवतमाळ लोकसभा मतदारसंघातले नव्हते, असा दावा त्यांनी केला. निष्ठावान असण्यासाठी माय नेक आणि बाप एक असावा लागतो, असा हल्लाबोल केला. त्यालाही संजय देशमुख यांनी उत्तर दिले. संजय राऊत काय टीका करतात याकडे आम्हाला लक्ष देत नाही. आम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलं, त्यांचा आम्हाला विचार करायचा. संजय राऊत हे सगळ्यांवरच टीका करतात. संजय राऊत हे वायफळ बोलतात. संजय राऊत यांच्या बोलण्यामुळेच ठाकरे गट कमजोर होत चालला आहे, असा हल्लाबोल संजय देशमुख यांनी केला.
मी काय शपथ वगैरे घेतली नव्हती
यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांचा एक जुना ओडिओ सगळ्यांना ऐकवला. माझ्या आईने मला ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जायला सांगितले आहे, असे संजय देशमुख या ऑडिओत बोलताना दिसत आहेत. यावरही देशमुख यांनी उत्तर दिले. तो व्हिडीओ खरा आहे. बाकी मी काय शपथ वगैरे घेतली नव्हती. टीका होतच राहणार आहे, असे स्पष्टीकरण संजय देशमुख यांनी दिले.
