AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फक्त भांडुपमधील मैत्री बंगला नाही, तर सामना कार्यालयाचीदेखील रेकी’, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

संजय राऊत यांच्या भांडुप येथील बंगल्यावर झालेल्या रेकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीत रेकी करणारे कैद झाले आहेत. राऊत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना 'सामना' कार्यालयासह त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेरही रेकी झाल्याचा दावा केला आहे.

'फक्त भांडुपमधील मैत्री बंगला नाही, तर सामना कार्यालयाचीदेखील रेकी', संजय राऊतांचा खळबळजनक दावा
'फक्त भांडुपमधील मैत्री बंगला नाही, तर सामना कार्यालयाचीदेखील रेकी', संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 20, 2024 | 3:48 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा भांडुप येथील मैत्री बंगल्याची काही इसमांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत हे सत्ताधारी पक्षांवर दररोज निशाणा साधतात. राऊत हे महाविकास आघाडीतील ताकदवान नेते आहेत. पण त्यांच्या घराचीच आता रेकी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्याबाहेर आज सकाळी दोन जण रेकी करण्यासाठी आल्याची माहिती आहे. रेकी करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत. तसेच संजय राऊत यांच्या बंगल्याबाहेर मोबाईल कॅमेरे लावून रेकी करण्यात आल्याचादेखील धक्कादायक दावा करण्यात आला आहे. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी याबाबत पुरावे स्पष्ट केले आहेत. तर विधानसभेत ठाकरे गटाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांनी सभागृहात विषय मांडला आहे. या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या माहितीनंतर आता संजय राऊत यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

संजय राऊत यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर ते मातोश्री बाहेर आले. यावेळी प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संजय राऊतांनी महत्त्वाची माहिती दिली. “आमच्या बैठका सुरुच असतात. पक्षाची बांधणी सुरु आहे. भविष्यातील महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून, शहरातून पदाधिकारी येत आहेत, त्यांच्याशी चर्चा केली जातेय”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

संजय राऊत रेकीवर काय म्हणाले?

“हे बघा माझ्याकडे त्याची माहिती आहे. ‘सामना’ कार्यालयाची रेकी होते. माझ्या घराची रेकी होते आणि दिल्लीतील घराचीदेखील रेकी होत असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे. ते आता रेकॉर्डवर आहे. पोलीस अधिकारी तपास करत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलले आहेत. आता विधानसभेत भास्कर जाधव यांनी माहिती दिली आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांची सध्या सुरक्षा काढून घेतली आहे. त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती. पण सध्या त्यांना साधी सुरक्षा आहे. याबाबत राऊतांना प्रश्न विचारला असता, “माझी सुरक्षा काढून टाकली. बघुया काय होतं ते, संतोष देशमुख सारखं काही लोकांना करायचं असेल, ते आपण बघू”, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.

“या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाही. काल कल्याणमध्ये ज्या पद्धतीने मराठी माणसांवर हल्ले झाले आणि सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून वारंवार घडताना दिसत आहे. भीती राहिलेली नाही. कुणाचाही कुठेही खून होईल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.