AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा खासदार गेला… गेला म्हणजे गेला… आपण दुखवट्याला आलोय, दहावं बारावं…; संजय राऊतांचा यवतमाळमध्ये घणाघात

sanjay raut news : ठाकरे गटाच्या यवतमाळमधील संजय राऊत यांनी फुटीर खासदारांवर जोरदार टीका केली.

तुमचा खासदार गेला... गेला म्हणजे गेला... आपण दुखवट्याला आलोय, दहावं बारावं...; संजय राऊतांचा यवतमाळमध्ये घणाघात
| Updated on: Jun 27, 2026 | 12:26 PM
Share

६ खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. फुटीर खासदारांच्या मतदारासंघातच ठाकरे गटाने जाहीर सभा आयोजित केल्या आहेत. ठाकरे गटाने पहिलीच सभा फुटीर खासदार संजय देशमुख यांच्या यवतमाळमधील लोकसभा मतदारसंघात घेतली. या पहिल्याच आयोजित सभेत संजय राऊत यांनी फुटीर खासदारांवर जोरदार निशाणा साधला. तुमचा खासदार गेला… गेला म्हणजे गेला… आपण दुखवट्याला आलोय, असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली.

संजय राऊत यांनी यवतमाळकरांना संबोधित करताना फुटीर खासदारांवर जोरदार टीका केली. फुटीर खासदारांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, आम्ही शिवसेनेसोबत राहतो म्हणून उपकार करत नाही. बाळासाहेबांनी खूप दिलं. निष्ठावंत शिवसैनिक आहेत म्हणून ही शिवसेना वादळात, संकटात उभी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सभा सुरू आहे. इथे शेतकऱ्यांचा माल येतो. विकला जातो. त्याला फार भाव मिळत नाही. १५ दिवसांपूर्वी एक माल आला आणि ५० कोटीला विकला गेला. तुमचा खासदार. खासदार गेले. गेले म्हणजे गेले. आपल्यासाठी ते गेले. त्या दुखवट्याला आपण आलो आहोत. आता दहावं बारावं करू आणि पुढच्या कामाला मोकळे होऊ. फार दुखं करायचं नाही. गाडा पाडा आणि शेवटी भगवा झेंडा फडकवा. ५० कोटी भाव झाला त्याचा. या बाजारात त्याला कोणी ५०० रुपयात घेतलं नसतं. तो शिवसेनेत आला. त्याला उद्धव ठाकरेंनी खासदार केला. म्हणून त्याची किंमत ५० कोटी झाली. उद्याच्या निवडणुकीत त्याची पाच रुपयेही किंमत ठेवू नका’.

‘मला आश्चर्य वाटतं, विकास निधीसाठी गेले. माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. अरे कसला विकास करणार तुम्ही. १२ वर्षात मोदी देशाचा विकास करू शकले नाही. त्या मोदींच्या वाराणासीत जा, रस्ते नाही, पाणी नाही, पूल नाही, ज्या मोदींचे बुट चाटायला गेला, ते विकास करू शकले नाही, तुम्ही काय विकास करणार. कुणाकडे गेले तर ज्यांनी राम मंदिराच्या पेटीतून २ हजार कोटी मोदींच्या लोकांनी चोरले. त्या मोदींचे बुट चाटायला गेले, असं म्हणत राऊतांनी जहरी टीका केली.

‘देशमुखला सांगा ही शिवसेना आहे. ही शिवसेना संपत नाही. ठाकरे संपत नसतात. ते पुन्हा पुन्हा राखेतून उभे राहतात आणि महाराष्ट्रावर पकड मजबूत ठेवतात. तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आला. म्हणजे उद्धव ठाकरेंना लोकांनी मते दिली. तुम्हाला गद्दारी करायची तर राजीनामा द्या आणि मग कळेल लोक कुणासोबत आहे. पण एकनिष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. आम्ही सर्व एकनिष्ठ आहोत. हा एकनिष्ठांचा सागर महासागर लाटा या गद्दारांना तडाखे देऊन तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

‘काल उद्धव ठाकरेंचं नागपूरला आगमन झालं. प्रचंड गर्दी झाली. एकनाथ शिंदे आणि गद्दारांनी पाहिलं असेल तर कळलं असतं शिवसेना जागेवर आहे. जागेवर राहिल. तुमच्या छाताडावर पाय ठेवून लोकसभा आणि विधानसभेला जाईल. यवतमाळ हा कायम बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारा जिल्हा आहे. शिवसेनेचा भगवा झेंडा यवतमाळवर कायम राहिला आणि कायम राहील, असे राऊतांनी सांगितले.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना