ते लोक भंपक… उद्धव ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून टीका करणाऱ्यांवर संजय राऊत बरसले
संजय राऊत यांच्याकडून परत एकदा सरकारवर जोरदार टीका करण्यात आलीये. यासोबतच त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबतच निवडणूक आयोगाचा देखील समाचार घेतलाय. यावेळी दिल्लीतील व्हायरल फोटोवरूनही त्यांनी टीका केलीये.

संजय राऊत यांनी नुकताच दिल्लीमध्ये नेमके काय घडले हे सांगितले आहे. संजय राऊत म्हणाले की, खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. दिल्लीतील बैठकीवेळी उद्धव ठाकरे यांना मागच्या रांगेत बसवण्यात आल्याच्या मुद्दावरून टीका करणाऱ्यांना देखील खडेबोल सुनावले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना तोडताना शिवराय आठवले नाही का? नरेश मस्के म्हणजे दुतोंडाचे गांडूळ आहे, असे त्यांनी म्हटले. स्क्रीनवरील माहिती बघण्यासाठी मागे बसलो होतो. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाची चोरी त्यांचाच बेवसाईटवरून पकडली आहे. निवडणूक आयोग खोटं बोलतंय. निवडणूक आयोग भाजपाचा हस्तक आहे, असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मागच्या रांगेत बसल्याचे सांगितले जात असल्यावर मोबाईलमधील इतर फोटो बघितली नाही का? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, प्रतिज्ञापत्र काय मागताय राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून चोरी पकडून दाखवली आहे. चीफ आहेत, सडके बटाटे आहेत , हे काय आहे हे सरळ दिसतं ना…तुम्ही सरळ मार्गाने निवडून आले नाहीत.
नरेंद्र मोदींना राहुल गांधी यांनी देशासमोर सरेंडर करायला लावलंय. सळो की पळो करून सोडलंय राहुल गांधी यांनी मोदींना. राहुल गांधींनी सांगितले की, ट्रम्प यांच्यासमोर नरेंद्र मोदी कशाप्रकारे शरणागत झाले आहेत. कोणाच्या टोक्यात चीफ आहे किंवा नाही हे कळाले. जर तुमच्या टोक्यात चीफ असतील तर तुम्ही ऑपरेशन सिंदूर हे ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन थांबवले नसते हो… निवडणूक आयोग खोट बोलतंय. निवडणूक आयोग मोदी आणि शाह यांचे गुलाम आहे. चोराला चोर साथीदार आहे.
लाखो मते कशी घुसवली, याची माहिती काल राहुल गांधी यांनी दाखवली. यावेळी संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर देखील भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, जर नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या तब्येची विचारपूस केली असती तर ज्या शरद पवारांनी मदतीच्या काळात एवढी मदत केली त्यांचा पक्ष काढून अजित पवारांना दिला नसता. शंकराचार्यांचा स्टेट गेस्टचा दर्जा का काढून घेतला असाही प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
