मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या शिष्टमंडळासह आज रात्री उशिरा मुंबईहून नागपुरात जाणार असल्याची बातमी ताजी असताना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला मोठा इशारा दिलाय. “तुमच्या सगळ्या फाईली तयार आहे. उद्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत नागपुरात जाऊन गौप्यस्फोट करणार”, असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय.