AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Deshmukh Case : ‘आक्रोश, प्रचंड गर्दी, संताप, धनंजय मुंडेंना….’ संतोष देशमुखांसाठी जनता रस्त्यावर

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ रेणापूरमध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे. तिथे मोर्चात सहभागी झालेल्या सर्वसामान्यांनी व्यक्त केलेल्या भावना बोलक्या आहेत. लोकांच्या मनातील चीड, संताप दिसून येत आहे.

Santosh Deshmukh Case : 'आक्रोश, प्रचंड गर्दी, संताप, धनंजय मुंडेंना....' संतोष देशमुखांसाठी जनता रस्त्यावर
Santosh Deshmukh Murder Case
| Updated on: Dec 27, 2024 | 12:39 PM
Share

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाच वातावरण आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसच मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी बीड जिल्ह्यातीत रेणापूर येथे आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी व त्यांचा मुलगा दोघे या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला आहे.

रेणापूरच्या या आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना सहआरोपी करुन 302 चा गुन्हा दाखल करा तसच त्यांच्यावर कोणीतही कारवाई न करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करा” अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या एका व्यक्तीने केली. “शासनाने पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यावी व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी” अशी मागणी दुसऱ्या आंदोलकाने केली. “संतोष देशमुख यांच्यासारख्या सरपंचाचा बेदम मारहाण करुन निर्घृण खून करण्यात येतो, मग आमच्यासारख्या सर्ववसामान्यांच काय? असा प्रश्न पडतो. आरोपींवर मोक्का अतंर्गत कारवाई करुन फाशीची शिक्षा द्यावी” अशी मागणी आणखी एका मोर्चेकऱ्याने केली.

‘….तर महाराष्ट्रातली जनता हा कायदा हातात घेईल’

“संतोष देशमुख यांची क्रूर हत्या होऊन आज 18 दिवस लोटलेत, राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेला आरोपी सापडत नाही, त्यातून प्रशासनाचा दुबळेपणा जनतेसमोर येत आहे. रेणापूर येथे जनता आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तो पर्यंत हे आंदोलन महाराष्ट्रभर होईल, या आंदोलनाची दखल घ्यावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम करावं ही आमची मागणी आहे. आज महाराष्ट्र बघत आहे, कानाकोपऱ्यात गुंडगिरीच साम्राज्य पसरलेलं आहे. आरोपी प्रशासनाला सापडत नसतील, तर महाराष्ट्रातली जनता हा कायदा हातात घेईल” अशी संतप्त प्रतिक्रिया एका आंदोलकाने व्यक्त केली.

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.