‘आनंदाचा शिधा’ सोबत साडी देखील मिळणार, राज्य सरकारची बजेटमध्ये तरतूद

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक साडी वाटप करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. यंदा शिवजयंती निमित्त प्रत्येक कुटुंबाला एक साडी देण्यात येणार आहे.

'आनंदाचा शिधा' सोबत साडी देखील मिळणार, राज्य सरकारची बजेटमध्ये तरतूद
ananda cha shidhaImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 2:33 PM

मुंबई | 5 मार्च 2024 : महाराष्ट्र शासनाने यंदाच्या शिवजयंती पासून ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा जिन्नसासोबत आता साडी देखील देण्याचा निर्णय बजेटमध्ये जाहीर केला होता. त्याची अमलबजावणी सहा मार्चपासून राज्यातील विविध रेशनिंग दुकानातून होणार आहे. अंत्योदय शिधापत्रक धारकांना दरवर्षी एक साडी भेट देण्यात येणार आहे. यामुळे गरीबांना सणावाराला गोडधोड करण्यासोबत घरातील महिलांना नवीन साडी परिधान करुन सण साजरा करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे अंतरिम बजेट सादर केले, त्यात ही घोषणा केली होती.

विविध सणानिमित्त रेशनिंग दुकानातून ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. अयोध्या येथे राम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ अल्पदरात देण्याचे जाहीर केले होते. शिवजयंती निमित्त वितरित करण्याचा ‘आनंदाचा शिधा’ सर्व रेशन दुकानात पोहचला आहे. या रेशन दुकानात आता अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाना मोफत साडी देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानूसार दरवर्षी लाभार्थ्यांना एक साडी देण्यात येणार आहे. यंदा शिवजयंतीच्या निमित्ताने ही साडी मिळणार आहे.

शिधा सोबत मोफत साडी वाटप

‘आनंदाचा शिधा’ साखर, तेल, रवा, चनाडाळ, मैदा, कच्चे पोहे या सहा शिधा जिन्नसाचा समावेश आहे. अंत्योदय रेशनकार्ड धारक कुटुंबांना यंदा साडी देखील मिळणार आहे. नाशिक विभागासाठी सुमारे पाच लाख 81430 नग साड्यांचा साठा उपलब्ध झाला असून यात धुळे नंदुरबार जिल्ह्यासाठी सुमारे एक लाख 81 हजार 915 तर खानदेशासाठी एकूण तीन लाख 16 हजार 841 साड्यांचा साठा उपलब्ध झाला आहे. सहा मार्चपासून याचं जिल्ह्यात वाटप होणार आहे असे जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. नाशिक विभागाला पाच लाख 81,430 नग साड्या त्यात धुळे जिल्ह्यासाठी 75 हजार 738 तर नंदुरबार जिल्ह्यासाठी एक लाख सहा हजार 177 साड्या, जळगाव जिल्ह्यासाठी एक लाख 34 हजार 926 नाशिक जिल्ह्यासाठी 11752 तर नगर जिल्ह्यासाठी 88 हजार साड्यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.