AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्यात चिता पेटवली अन् क्षणात… सरकारी रुग्णालयाच्या एका चुकीने भयंकर घडलं, संतापजनक प्रकार समोर!

Satara : साताऱ्यात अंत्यसंस्कार सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. नातेवाईकांना पेटलेली चिता विझवावी लागली आहे. सरकारी रुग्णालयाच्या एका चुकीमुळे नातेवेईकांवर ही वेळ आली आहे.

साताऱ्यात चिता पेटवली अन् क्षणात... सरकारी रुग्णालयाच्या एका चुकीने भयंकर घडलं, संतापजनक प्रकार समोर!
Satara HospitalImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 31, 2026 | 6:55 PM
Share

मृत्यू हे अंतिम सत्य आहे, जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येतात. अशातच आता साताऱ्यात अंत्यसंस्कार सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. नातेवाईकांना पेटलेली चिता विझवावी लागली आहे. सरकारी रुग्णालयाच्या एका चुकीमुळे नातेवेईकांवर ही वेळ आली आहे. याचे कारण म्हणजे शासकीय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल झाल्यामुळे हे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणाचा कळस

साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणाचा कळस पाहायला मिळाला. मृत्यूनंतरही मृत शरीराची हेळसांड झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील 51 वर्षीय सुरेश खोमणे या दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दोन्ही नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात दिले आणि याच ठिकाणी मोठी चूक झाली.

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल

साताऱ्यातील शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल झाल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे, तर एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. चिता पेटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, त्यामुळे पेटती चिता विझवण्याची वेळ नातेवाईकांवर आली. या घटनेमुळे कुटुंबीयांचा संताप अनावर झाला असून रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन

या घटनेनंतर साताऱ्यातील सरकारी रुग्णालयात नातेवाईकांनी मोठा गोंधळ घातला. त्यामुळे पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे यांना देखील नातेवाईकांनी यावेळी जाब विचारला. यावेळी शवविच्छेदन करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले. या घटनेमुळे काही काळ शासकीय रुग्णालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रूपये आरोग्य सुविधांसाठी खर्च करते. सामान्य नागरिकांना चांगले उपचार मिळावे, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी हा खर्च केला जातो. मात्र बहुतांशी सरकारी रुग्णालयांमध्ये मोठा हलगर्जीपणा होत असल्याचे याआधीही समोर आलेले आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...