AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्यात महिला डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, गळफास घेऊन संपवलं जीवन

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलीस आणि आरोग्य विभागातील वाद व अंतर्गत चौकशीमुळे त्या तणावात होत्या. वरिष्ठांकडे आत्महत्येचा इशारा देऊनही दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे.

साताऱ्यात महिला डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, गळफास घेऊन संपवलं जीवन
satara sampada munde
| Updated on: Oct 24, 2025 | 3:42 PM
Share

साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे फलटण उपजिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात तीव्र शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिला डॉक्टराने फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका वादात अडकल्या होत्या. डॉ. मुंडे या एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी झालेल्या वादामुळे चर्चेत होत्या. या प्रकरणानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.

तक्रारीकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष

या चौकशीदरम्यान तिने आपल्या वरिष्ठांकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली होती. या तक्रारीत तिने माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन असे स्पष्टपणे नमूद केले होते. मात्र या गंभीर तक्रारीकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याचे बोललं जात आहे. अखेर सततचा मानसिक तणाव आणि प्रशासकीय अडचणींना कंटाळून महिला डॉक्टरने यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

या घटनेची नोंद फलटण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महिला डॉक्टरच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय आहे, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कामाचा वाढता ताण, प्रशासकीय अडचणी, वरिष्ठांचा दबाव आणि अंतर्गत चौकशी यामुळे आरोग्य कर्मचारी अनेकदा गंभीर मानसिक तणावाखाली असतात.

वैद्यकीय क्षेत्रात हळहळ

सध्या वैद्यकीय संघटनांकडून प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महिला डॉक्टरच्या निधनामुळे फलटण शहर आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

दरम्यान याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे अशा अनेक केसेस आतापर्यंत आलेल्या आहेत. विशेषत: पुणे, ठाणे आणि मुंबईतील काम करणाऱ्या महिला पोलिसांनाही अशाच प्रकारे त्रास दिला जातो. जर अशा पद्धतीने विभागात काम करणाऱ्या महिलाही सुरक्षित राहत नसतील तर आम्ही ज्यांच्या हातात हे गृहखातं आहे त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायच्या. याला त्यांनी उत्तर द्यायला हवं. तुम्ही आता कितीही चौकशी करा, एक जीव गेला. याची काळजी जर आधीच घेतली असती, तीन महिन्यांपासून तिला त्रास दिला जात होता. अजून धक्कादायक खुलासे पुढे येतील, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.