AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! साताऱ्यात पाच वर्षाच्या मुलाची अनैसर्गिक अत्याचार करुन हत्या, अल्पवयीन आरोपी अटकेत

अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने आपण मुलाची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली. मोबाईलमध्ये अश्लील क्लिप पाहून मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला आणि नंतर त्याची हत्या केल्याचे आरोपीने सांगितले.

धक्कादायक ! साताऱ्यात पाच वर्षाच्या मुलाची अनैसर्गिक अत्याचार करुन हत्या, अल्पवयीन आरोपी अटकेत
साताऱ्यात पाच वर्षाच्या मुलाची अनैसर्गिक अत्याचार करुन हत्या
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 5:39 PM
Share

सातारा : एका पाच वर्षाच्या बालकावर अनैतिक अत्याचार करुन त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सातारा तालुक्यातील म्हसवे गावात उघडकीस आली आहे. याच गावातीलच एका बंद घरात या मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मंगळवारी सायंकाळी गायब झाला मुलगा

मंगळवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास घराबाहेर खेळता खेळता हा मुलगा अचानक गायब झाला. कुटुंबीयांनी परिसरात मुलाची शोधाशोध सुरु केली. बाहेर कुठेही मुलगा सापडला नाही. मुलाचा शोध घेत असताना कुटुंबीय बंद घराजवळ आले. या बंद घरात मुलगा मृतावस्थेत आढळून आल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला. दीड तास शोधाशोध केल्यानंतर 7.30 च्या सुमारास मुलगा थेट मृतावस्थेत सापडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. कुटुबीयांकडून तात्काळ या घटनेची माहिती सातारा पोलिसांनी देण्यात आली. माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस तसेच पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने केली हत्या

सदर घटनेतील आरोपीही अल्पवयीन असून तो मयत मुलाच्या शेजारीच राहतो. हत्येचा तपास करीत असताना पोलिसांनी गावातील लोकांची विचारपूस केली. पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिपत्याखाली एक पथक तयार केले. या पथकाकडून प्रत्येकाची चौकशी सुरु होती. या चौकशी दरम्यान पोलिसांकडे आरोपी तरुणाबाबत संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी सदर अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याची सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान अल्पवयीन युवकाने हत्येची कबुली दिली. अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने आपण मुलाची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली. मोबाईलमध्ये अश्लील क्लिप पाहून मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला आणि नंतर त्याची हत्या केल्याचे आरोपीने सांगितले. दोन तासाच्या आत सातारा गुन्हे शाखेने हत्येचा उलगडा केला आहे. (A five-year-old boy was brutally murdered in Satara)

इतर बातम्या

Chandrapur Murder | डोक्यात जोरदार प्रहार, 35 वर्षीय महिलेची नदीकाठी हत्या, तीन मुलं पोरकी

Murder | आधी धमकावून कबर खणायला लावली, नंतर गोळ्या झाडून त्यातच पुरला तरुणीचा मृतदेह

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.