Satara Murder : माता न तू वैरीणी ! साताऱ्यात जन्मदात्या आईनेच घेतला पाच महिन्याच्या मुलाचा जीव

आरोपी महिलेने 12 एप्रिल रोजी स्वतःच्या बाळाची नाक दाबून हत्या केली होती. त्यानंतर नातेवाईकांना बाळाचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे सांगितले. नातेवाईकांनीही महिलेवर विश्वास ठेवत एका शेतात बाळाचा अंत्यविधी केला. त्यानंतर 23 एप्रिल रोजी महिलेने लोणंद पोलिसांना फोन करुन आपणच आपल्या बाळाची नाक दाबून हत्या केल्याचे सांगितले.

Satara Murder : माता न तू वैरीणी ! साताऱ्यात जन्मदात्या आईनेच घेतला पाच महिन्याच्या मुलाचा जीव
साताऱ्यात जन्मदात्या आईनेच घेतला पाच महिन्याच्या मुलाचा जीव
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 1:46 AM

सातारा : मातृत्वाला कलंक फासणारी घटना सातारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. एका जन्मदात्या आईनेच आपल्या 5 महिन्याच्या मुला (Boy)ची नाक दाबून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील फलटण तालुक्यात तरडगाव येथे उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर बाळाच्या नैसर्गिक मृत्यूचा बनाव केला. त्यानंतर नातेवाईकांनी बाळावर रितीनुसार अंत्यसंस्कारही केले. मात्र घटनेच्या 12 दिवसांनंतर महिलेने स्वतःच लोणंद पोलिसांना फोन करुन हत्येची कबुली दिली. यानंतर लोणंद पोलिसांनी महिलेला तात्काळ अटक केली. महिलेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. (A mother killed her five-month-old baby in Phaltan taluka of Satara)

नाक दाबून बाळाची हत्या आणि नैसर्गिक मृत्यूचा बनाव केला

आरोपी महिलेने 12 एप्रिल रोजी स्वतःच्या बाळाची नाक दाबून हत्या केली होती. त्यानंतर नातेवाईकांना बाळाचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे सांगितले. नातेवाईकांनीही महिलेवर विश्वास ठेवत एका शेतात बाळाचा अंत्यविधी केला. त्यानंतर 23 एप्रिल रोजी महिलेने लोणंद पोलिसांना फोन करुन आपणच आपल्या बाळाची नाक दाबून हत्या केल्याचे सांगितले. तसेच तुम्ही तात्काळ या नाहीतर मी आणखी कुणाचा तरी खून करेन असे सांगितले. यानंतर लोणंद पोलिसांनी तात्काळ धाव घेत महिलेला ताब्यात घेतले आणि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. रविवारी महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मात्र महिलेने स्वतःच्या मुलाची हत्या का केली याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलिस याबाबत महिलेची कसून चौकशी करत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी दिली आहे. (A mother killed her five-month-old baby in Phaltan taluka of Satara)

इतर बातम्या

Chattisgarh Murder : आधी दारू पाजली, नंतर चाकूने वार करीत पेट्रोल ओतून पेटवून दिले! छत्तीसगडमधील खुनाची काही तासांत उकल

UP Murder : प्रेमाच्या त्रिकोणातून विटेने ठेचून तरुणाची हत्या; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह