मेंढपाळाला सापडलेली 147 तांब्याची नाणी साताऱ्यातील शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपूर्द

ही नाणी 16 व्या आणि 18 व्या शतकातील असून यामध्ये शिवराई नाणी, अकबर नाणी, बहामणी सुलतान नाणी, निजाम शाही नाणी, ईस्ट इंडिया कंपनीची नाणी यांचा समावेश असून त्याचे वजन साधारण अडीच किलो ग्रॅम आहे. त्याची सध्याच्या बाजार भावात लाखोंची किंमत होत आहे.

मेंढपाळाला सापडलेली 147 तांब्याची नाणी साताऱ्यातील शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपूर्द
पुणे पुरातत्व विभागाकडून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला नाणी सुपूर्दImage Credit source: tv9 mahadev
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 7:52 PM

साताराः पुण्याच्या पुरातत्व विभागाकडून (Archaeological Department, Pune) सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला (Chhatrapati Shivaji Maharaj Museum Satara) सुपूर्द करण्यात आली. या संग्रहालयाचे प्रमुख प्रविण शिंदे यांनी ती स्वीकारली असून नवीन संग्रहालयात ती प्रदर्शित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्याच्या बाजारभावानुसार या नाण्यांची किंमत लाखो रुपये आहे. त्यामुळे ही नाणी नागरिकांसाठी प्रदर्शित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सापडलेल्या या नाण्यामध्ये शिवराई नाणी (Coins of the Shiva period), अकबर नाणी, बहामणी सुलतान नाणी, निजाम शाही नाणी, ईस्ट इंडिया कंपनीची नाणी यांचा समावेश आहे.

ही नाणी सापडल्यामुळे एका काळातील चलन कसे होते, आणि काय होते त्याची माहिती लोकांना मिळणार आहे. ही नाणी इतिहास संशोधक, अभ्यासकांसाठी उपयोगी ठरणार असल्याचेही संस्थेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुयश रोकडेला मिळाली नाणी

सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहलयात शिवकालीन अकबर कालिन147 तांब्याची नाणी पुण्याच्या पुरातत्व विभागाकडून सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे प्रमुख प्रवीण शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. ही नाणी मौजे विऱ्हम (ता. खेड, जि. पूणे) येथे 4 जानेवारी रोजी सुयश रोकडे हा मुलगा रोहिदास सावंत यांच्या शेतात शेळ्या चारण्यास घेऊन गेला होता. शेतामध्ये सापडली असून ती तहसिलदार खेड यांनी जप्त करून पुढील संशोधनासाठी सहायक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांच्याकडे दिली होती.

ईस्ट इंडिया कंपनीची नाणी

ही नाणी 16 व्या आणि 18 व्या शतकातील असून यामध्ये शिवराई नाणी, अकबर नाणी, बहामणी सुलतान नाणी, निजाम शाही नाणी, ईस्ट इंडिया कंपनीची नाणी यांचा समावेश असून त्याचे वजन साधारण अडीच किलो ग्रॅम आहे. त्याची सध्याच्या बाजार भावात लाखोंची किंमत होत आहे. ही नाणी नवीन संग्रहालयमध्ये प्रदर्शित केली जाणार असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे प्रमुख प्रवीण शिंदे यांनी सांगितले.

नाण्यांमुळे संस्थेकडे अमूल्य देणगी

ही नाणी सापडली असल्याने याचा फायदा इतिहास संशोधक आणि अभ्यासकांनाही होणार आहे. ही नाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्याद्वारे एका कालखंडाचा इतिहास उलघडणार आहे. या संस्थेकडे ही नाणी सूपूर्द करण्यात आली असल्याने संस्थेकडेही ही अमूल्य देणगी असल्याचे मतही व्यक्त केले गेले आहे.

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.