‘अहोsss उठा ना, मला बघायचंय तुम्हाला!’ शहीद सुभेदार विजय शिंदे यांच्या पत्नीचा काळीज चिरणारा टाहो, वीरपुत्र पंचतत्त्वात विलीन

लडाखमध्ये झालेल्या अपघातामध्ये सात जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये विसापूर खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचा समावेश आहे. देशसेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. या घटनेमुळे खटाव तालुका दुखामध्ये बुडाला आहे. आपल्या पतीचे निधन झाल्याची बातमी समजल्यापासून विजय शिंदे यांच्या पत्नी स्वत: सावरू शकत नाहीयेत.

‘अहोsss उठा ना, मला बघायचंय तुम्हाला!’ शहीद सुभेदार विजय शिंदे यांच्या पत्नीचा काळीज चिरणारा टाहो, वीरपुत्र पंचतत्त्वात विलीन
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 2:04 PM

मुंबई : लडाखमध्ये (Ladakh) देशसेवा बजावत असताना शहीद झालेल्या सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यावेळी शिंदे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. सुभेदार विजय शिंदे (Subhedar Vijay Shinde) यांच्याच शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिव गावामध्ये येताच सर्वांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. आपल्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव एकवटला. पतीचे पार्थिव पाहून अहो उठा ना…अहो उठा ना… असा टाहो पत्नीने (Wife) फोडला. यावेळी प्रत्येकाचे काळीज हेलावून गेले…पार्थिव गावामध्ये येताच गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. संपूर्ण रस्त्यावर रांगोळी आणि बॅनर लावण्यात आले.

उठा ना…अहो उठा ना… टाहो पत्नीचा…

लडाखमध्ये झालेल्या अपघातामध्ये सात जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये विसापूर खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचा समावेश आहे. देशसेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. या घटनेमुळे खटाव तालुका दुखामध्ये बुडाला आहे. आपल्या पतीचे निधन झाल्याची बातमी समजल्यापासून विजय शिंदे यांच्या पत्नी स्वत: सावरू शकत नाहीयेत. बापाचा चेहरा मुलांना पाहुद्या म्हणत पत्नीने परत एकदा टाहो फोडला. शहीद जवान शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. फुलांचा वर्षाव करत शहीद शिंदे यांना गावकऱ्यानी निरोप दिलाय. यावेळी जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी शहीद जवानांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

हे सुद्धा वाचा

24 वर्ष लष्करात बजावली सेवा

विजय सर्जेराव शिंदे हे 1998 मध्ये 22 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते. 24 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचे संरक्षण केले. विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे यांनीही लष्करात सेवा बजावली आहे. इतकेच नाही तर त्यांचे मोठे भाऊ प्रमोद शिंदे हे देखील लष्करात पैरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत. 26 जवानांचे परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असताना लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले.

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.