Suhas Babar: आमच्यासारखे 242 आमदार म्हणून ते…मुख्यमंत्र्यांविषयी शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांचे धक्कादायक वक्तव्य

MLA Suhas Babar on Devendra Fadnavis : शिंदेसेना आणि भाजपमधील काही ठिकाणी वर्चस्वाचा वाद पुन्हा एकदा उफाळल्याचे दिसून येते. शिवसेना शिंदे गटाचे सांगलीचे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांबाबत असंच मोठं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्याची एकच चर्चा सुरू झाली आहे.

Suhas Babar: आमच्यासारखे 242 आमदार म्हणून ते...मुख्यमंत्र्यांविषयी शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांचे धक्कादायक वक्तव्य
सुहास बाबर, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 04, 2026 | 1:28 PM

MLA Suhas Babar on Devendra Fadnavis : शिवसेना शिंदे गटाचे सांगलीतील विटा-खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे,आमच्यासारखे 242 आमदार आहेत, म्हणून मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांना विचारा सुहास बाबर कोण आहेत, असं देखील चॅलेंज आमदार सुहास बाबर यांनी विटयाचे माजी नगराध्यक्ष भाजपाचे नेते वैभव पाटलांच्यावर टीका करताना दिलं आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकी निमित्ताने खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटातील पळशी येथे आयोजित सभेतून आमदार सुहास बाबरांनी हे विधान केलं आहे. तसेच तालुक्यातील काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार, अजित पवार पक्ष,ठाकरे गट आणि भाजपा आपण चालवतो,असं देखील आमदार बाबर यांनी सांगितले. विटयाचे माजी नगराध्यक्ष भाजपाचे नेते वैभव पाटील यांच्यावर टीका करताना आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत हे भाष्य केले आहे.

प्रभाकर पाटील यांची माघार

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक मोठी घडामोडी सांगलीच्या तासगाव मध्ये घडली आहे. तासगाव तालुक्यातील चिंचणी जिल्हा परिषद गटातून माजी खासदार व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजयकाका पाटलांचे पुत्र प्रभाकर पाटलांनी माघार घेतली आहे, प्रभाकर पाटील यांच्याकडून चिंचणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अपक्ष अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केला होता,मात्र अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी प्रभाकर पाटलांनी आपले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.या ठिकाणी प्रभाकर पाटील यांच्या विरोधात त्यांच्याच भावकीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अक्षय पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरलेत,त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने भावकीत वाद निर्माण होऊ नये, यासाठी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याचे संजयकाका पाटील प्रभाकर पाटलांच्याकडून स्पष्ट करण्यात आल आहे. त्यामुळे याठिकाणी आता राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजपा अशी लढत होणार आहे.

महेश खराडे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचा भाजपमध्ये उद्या पक्ष प्रवेश होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महेश खराडे यांचा भाजप प्रवेश होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये उद्या सायंकाळी सात वाजता हा पक्ष प्रवेश सोहळा होईल. या पक्ष प्रवेशाने स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच राजू शेट्टी यांना मोठा धक्का. तर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.