school : राज्यात उद्यापासून शाळेची घंटा पुन्हा वाजणार, या विभागातल्या शाळा सुरू, वाचा सविस्तर

school : राज्यात उद्यापासून शाळेची घंटा पुन्हा वाजणार, या विभागातल्या शाळा सुरू, वाचा सविस्तर
School

मोठ्या ब्रेकनंतर राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू होत आहेत. काही शाळा उद्यापासून सुरू होत आहेत. तर काही शाळा 16 डिसेंबरपासून सुरू होत आहेत. त्यामुळे शाळेची घंटा पुन्हा ऐकायला येणार आहे. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 14, 2021 | 8:05 PM

मुंबई :  गेल्या काही महिन्यांपासून शाळेची घंटा ऐकू येणे बंद झाले होते, कारण कोरनाने एक मोठा ब्रेक लावला होता. मात्र या मोठ्या ब्रेकनंतर राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू होत आहेत. काही शाळा उद्यापासून सुरू होत आहेत. तर काही शाळा 16 डिसेंबरपासून सुरू होत आहेत. त्यामुळे शाळेची घंटा पुन्हा ऐकायला येणार आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यातल्या शाळा सुरू होणार

पुणे महानगरपालिका हददीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येत्या गुरुवारपासून (16 डिसेंबर, 2021) सुरु होणार आहेत. महापौर मुरलीधर मोहळ यांनी बदल नुकतीच माहिती दिली आहे. कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून याची पालकांनी नोंद घ्यावी ,असे मोहळ यांनी म्हटले आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत, विभागीय सौरभ राव , महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत चर्चा करुन हा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरु करत असताना ज्या काही नियमावली ठरवण्यात आले आहे, मार्गदर्शक नियमावलीनुसार सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण असेल , सोशल डिस्टंस असेल अश्या सर्व सूचना देता तसेच त्याची अंमलबजावणी करत शाळा सुरु केल्या जाणार आहेत.

ठाण्यातल्या शाळा उद्यापासून सुरू होणार

ठाणे शहरातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग उद्या 15 डिसेंबरपासून सुरू करण्यात येत आहेत. दरम्यान कोव्हिड 19 तसेच ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी शिक्षक, पालक तसेच विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. ठाण्यात शाळा सुरू करणेबाबत पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.‍विपिन शर्मा यांनी यापूर्वीच बैठक घेवून शाळा सुरू करणेबाबत बाबींचा सविस्तर आढावा घेतला आहे. त्यानुसार ठाण्यातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता शाळांना विद्यार्थी आणि पालकांचा कसा प्रतिसाद मिळतो? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Omicrom : चिंता वाढवणारी बातमी, दिवसभरात ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें