छगन शिकल्लकर यांनी जोपासली शिल्पकला, शिल्पातून साकारल्या वेगवेगळ्या कलाकृती

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 19, 2021 | 5:50 PM

शिकल्लकर यांना शालेय जीवनापासूनच चित्रकलेची आवड होती. निसर्गाने निर्माण केलेल्या सृष्टीत अनमोल खजिना दडलेला आहे. झाडांची मुळं, फांद्या, लाकूड, वेली यात विविध प्रकारच्या कलाकृती दडलेल्या असतात.

छगन शिकल्लकर यांनी जोपासली शिल्पकला, शिल्पातून साकारल्या वेगवेगळ्या कलाकृती
chhangan shikallar

Follow us on

धुळेः शिल्पकलेची अनेकांना आवड असते. शिल्पात कोरलेली चित्र कायमच मनमोहित करतात. देवाकडून जन्मजात मिळालेल्या याच नजरेच्या माध्यमातून त-हाडी येथील सामान्य कुटुंबाचे छगन जगन्न शिकल्लकर यांनी काष्ठशिल्पाचा छंद चांगल्या पद्धतीनं जोपासलाय. शिकल्लकर यांना शालेय जीवनापासूनच चित्रकलेची आवड होती. निसर्गाने निर्माण केलेल्या सृष्टीत अनमोल खजिना दडलेला आहे. झाडांची मुळं, फांद्या, लाकूड, वेली यात विविध प्रकारच्या कलाकृती दडलेल्या असतात.

उच्च प्रकारची शिल्पकला म्हणूनही काष्ठशिल्प गणले जाते

शिल्पकलेच्या दगड आणि धातू या दोन माध्यमांप्रमाणेच लाकूड किंवा काष्ठ हेही एक महत्त्वाचे माध्यम आहे. हस्त व्यवसाय आणि इतर उपयुक्त कला इत्यादींत जसा लाकूडकामाचा अंतर्भाव होतो, त्याचप्रमाणे उच्च प्रकारची शिल्पकला म्हणूनही काष्ठशिल्प गणले जाते. जंगलातील अनेक वनस्पती, झाडांपासून विविध आकार असलेली शिल्पे तयार होतात. परंतु ते प्रत्येकाच्या नजरेस पडत नाहीत. कारण त्यास पारखी कलाकाराच्या नजरेची गरज असते. छगन जगन्न शिकल्लकर यांनीसुद्धा काष्ठशिल्पाची कला जोपासलीय.

शालेय जीवनापासूनच जोपासला छंद

घरीच त्यांनी आपली शिल्प कार्यशाळा समजून कामाला सुरुवात केली. जातीने आदिवासी असलेल्या शिकल्लकर यांनी सुतार कामाची सर्व अवजारे आणली आणि लाकडाच्या प्रत्येक तुकड्यापासून एक सुंदर शिल्प आकार घेऊ लागले. मागील 20 वर्षांपासून त्यांनी ही कला जोपासली असून, आज अनेक सुंदर शिल्पे त्यांच्याकडे तयार झालीत. लाकडांना आकार देऊन सुंदर काष्ठशिल्प घडविण्याचे काम छगन शिकल्लकर करीत असतात. आपल्या जबाबदारीतून मिळालेल्या फावल्या वेळेत ते आपला छंद जोपासतात. त-हाडी येथील घरामध्ये त्यांनी तयार केलेले अनेक काष्ठशिल्प अडगळीत पडलेले दिसून येतात.

असे तयार होते काष्ठ शिल्प…..!

एक शिल्प बनविण्यासाठी त्यांना साधारण 8 दिवस अथवा दोन महिने देखील लागतात. प्रत्येक शिल्पाच्या आकारानुसार ते बनविण्याचा कालावधी अवलंबून असतो. शिल्पासाठी आणलेल्या लाकडाला पटाशी, किकरे, काणस या अवजारांचा वापर करून वेगळा आकार दिला जातो. आवश्यकतेनुसार जोडणी करून तर काही अखंड काष्ठशिल्पाची पॉलिश पेपरने घसाई केली जाते. त्यामुळे ते शिल्प गुळगुळीत होते. पॉलिशचा लेप दिल्यानंतर ते अधिक आकर्षित होते. एकदा बनविलेल्या शिल्पासारखे सेम टू सेम दुसरे शिल्प तयार होत नाही. प्रत्येक शिल्पाचे वेगळेच महत्त्व असल्याचे शिकल्लकर यांनी सांगितले. या काष्ठशिल्पांसाठी ते शिवन, जांभूळ, साग, बोर, अंजन या जातीच्या लाकडांचा वापर करतात.

आकर्षक शिल्पेसुद्धा संग्रहात

छगन शिकल्लकर यांच्या संग्रहात बैलगाडी, लाटणे ,बाजवड, गवराई,,रोटपाटले पाटल, काम शिल्प, आदी आकर्षक काष्ठशिल्पे आहेत. मी छंदातून जोपासलेल्या काष्ठ्शिल्पांचे जिल्हास्तरावर प्रदर्शन भरवण्याची माझी इच्छा आहे. मात्र आजपर्यंत ही संधी मिळू शकली नाही याची खंत आहे, असंही छगन शिकल्लकर सांगतात. काष्ठ हे शिल्पाच्या सर्वांत प्राचीन माध्यमांपैकी एक आहे. लाकडातून शिल्पाकृती कोरून काढण्याची परंपरा आजही प्रचलित आहे. शिकल्लकर यांच्या काष्ठकलेतून भारतीय कलेच्या ऐतिहासिक प्रवासाचा बोध होतो, असंही डी. एस. मोरे या कलाशिक्षकानं सांगितलंय.

संबंधित बातम्या

नवी मुंबईत महिन्याभरापासून कोरोना रुग्ण पन्नाशीतच; परिस्थिती आटोक्यात मात्र कोरोनामुक्ती कधी?

यंदा भाऊरायाच्या हाती खाद्यबंधन; बहिण बांधणार वडापाव, समोसा राखी

sculpture by Chhagan Shikallakar, various works of art created from sculpture

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI