AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नो व्हीआयपी ट्रीटमेंट! वयाच्या ऐंशीव्या वर्षीही Sharad Pawar विमानतळावर सर्वसामान्यांसारखे रांगेत

पहाटे सहा वाजल्यापासून आपला दिनक्रम सुरू करून कार्यकर्त्यांना भेटणारे, त्यांच्या समस्या जाणून घेणारे आणि त्यांचे प्रश्न तिथल्या तिथे तातडीने सोडवणारे राष्ट्रवादीचे (ncp) सर्वेसर्वा शरद पवार सर्वांना माहीत आहेत.

नो व्हीआयपी ट्रीटमेंट! वयाच्या ऐंशीव्या वर्षीही Sharad Pawar विमानतळावर सर्वसामान्यांसारखे रांगेत
वयाच्या ऐंशीव्या वर्षीही Sharad Pawar विमानतळावर सर्वसामान्यांसारखे रांगेतImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 29, 2022 | 3:54 PM
Share

मुंबई: पहाटे सहा वाजल्यापासून आपला दिनक्रम सुरू करून कार्यकर्त्यांना भेटणारे, त्यांच्या समस्या जाणून घेणारे आणि त्यांचे प्रश्न तिथल्या तिथे तातडीने सोडवणारे राष्ट्रवादीचे (ncp) सर्वेसर्वा शरद पवार सर्वांना माहीत आहेत. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही झंझावाती प्रचार दौरे करणारे, तरुणांनाही लाजवेल असे भरपावसात सभा घेणारे शरद पवारही (Sharad Pawar) सर्वांना माहीत आहेत. त्याशिवाय दुष्काळ असो की भूकंप, वादळ असो की पूरस्थिती प्रत्येक ठिकाणी स्वत: जाऊन परिस्थितीची पाहणी करून आपत्तीग्रस्तांचे अश्रू पुसणारेही पवार माहीत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रातील संरक्षण आणि कृषी मंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेल्या शरद पवारांचा आता आणखी एक साधेपणा समोर आला आहे. देशातील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेले व्हीव्हीआयपी (vvip) नेते असतानाही पवार विमानतळावर सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहिलेले दिसले. त्यामुळे पवारांचा साधेपणा लोकांसमोर आला आहे. पवारांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे.

शरद पवार हे देशातील मोठं नाव आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील पवार हे प्रमुख दावेदार आहेत. देशातील अनेक नेते पवारांचा सल्ला घेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मी पवारांचं बोट पकडून राजकारणात आल्याचं विधान केलं होतं. मात्र, देशातील एवढे महत्त्वाचे नेते असूनही पवारांनी नेहमीच साधेपणा जपला आहे. कोणताही बडेजाव त्यांनी ठेवला नाही. मागे ठाणे जिल्ह्यात ते एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी पवारांनी कार्यकर्त्याच्या झोपडीत जेवणाचा अस्वाद घेतला होता. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. आता पवारांचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

फोटो काय सांगतो?

आज सकाळी शरद पवार दिल्लीला निघाले होते. त्यासाठी मुंबई विमानतळावर आले होते. युके 970 मुंबई ते दिल्ली फ्लाईटच्या बोर्डिंगवेळी पवार रांगेत सर्वसामान्यांप्रमाणे उभे असल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली विमानतळावर बोर्डिंगची भली मोठी रांग लागलेली होती. पवार या रांगेत उभे असल्याचं दिसतं. त्यांच्या हातात पेपर असून तोंडाला मास्क लावल्याचं दिसतं. त्यांच्या मागे आणि पुढे काही लोक उभे असल्याचंही दिसतंय. विशेष म्हणजे पवार काचेचा आधार घेत बोर्डिंगच्या रांगेत उभे होते. कोणताही बडेजाव न करता आणि व्हीआयपी संस्कृती बाजूला ठेवून पवार सर्वसामान्यांसारखे रांगेत उभे असल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. एकीकडे व्हीआयपी असल्याचं सांगून विमान लेट केल्याच्या अनेक बातम्या वाचायला ऐकायला मिळत असतानाच पवारांच्या या साधेपणाने अनेकांची मने जिंकली आहेत.

संबंधित बातम्या:

तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, भाजप विरोधात एकत्र या, mamata banerjee यांचा एल्गार, पवारांसह गैरभाजप मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्रं

दोन वर्षांनंतर गाजणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आखाडा, तारीखही ठरली, यंदा साताऱ्यात दंड कडाडणार

Maharashtra News Live Update : दिल्ली विधानसभा पेपरलेस होणार, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची घोषणा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.