AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता शरद पवारांनाही सर्वात मोठा धक्का; पक्षात फूट? काही खासदार थेट…राजकारणात प्रचंड खळबळ!

ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केल्याने सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. असे असतानाच आता शरद पवार यांच्या पक्षातही मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांच्या पक्षाचे काही खासदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात आहेत.

आता शरद पवारांनाही सर्वात मोठा धक्का; पक्षात फूट? काही खासदार थेट...राजकारणात प्रचंड खळबळ!
sharad pawar mpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2026 | 8:40 PM
Share

Sharad Pawar MP Revolt : ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केल्याने सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. हे खासदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. हे बंड रोखण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न करण्यात आला. परंतु सध्यातरी यात यश येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. कायदेशीर बाबी तपासून झाल्यानंतरच या बंडखोर खासदारांचा शिंदे गटातील प्रवेश जाहीर केला जाणार आहे. खासदारांनी बंड केल्यानंतर आता ठाकरे गटाकडून या खासदारांच्या अपात्रतेसाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब केला जात आहे. विरोधी बाकावर असलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेत या घडामोडी घडत असतानाच आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आता शरद पवार यांच्या पक्षातील काही खासदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात आहेत.

सुनेत्रा पवार यांची अमित शाहांसोबत चर्चा

सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांच्या पक्षातही मोठी फूट पडू शकते. कारण  शरद पवार यांच्या पक्षाचे काही खासदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांचे काही खासदार यांच्यात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी संपर्कात असलेल्या खासदारांबाबत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे नेते अमित शाहा यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेवेळी खासदार पार्थ पवार हेदेखील उपस्थित होते, असे सांगितले जात आहे.

नेमके कोणते खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात?

लोकसभेच्या 2024 सालच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला एकूण आठ जागांवर विजय मिळवता आला होता. म्हणजेच लोकसभेत शरद पवार यांचे एकूण आठ खासदार आहेत. तर याच निवडणुकीत अजित पवार यांना फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला होता. शरद पवार यांच्या एकूण 8 खासदारांपैकी काही खासदार हे सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. परंतु हे खासदार नेमके किती आहेत? ते खासदार कोण आहेत? याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय घडणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Follow Us
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात