AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मतदानाला काही तास बाकी असताना शरद पवारांनी डाव फिरवला? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग!

विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहीले आहेत, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! मतदानाला काही तास बाकी असताना शरद पवारांनी डाव फिरवला? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग!
| Updated on: Nov 18, 2024 | 5:46 PM
Share

विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहीले आहेत, आज प्रचाराच्या तोफा थंडावतील. येत्या वीस नोव्हेंबरला बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे. तर तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. 2019 नंतर राज्यात दोन बड्या पक्षात फूट पडली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षाचे दोन गट झाले. त्यापैकी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं भाजपला पाठिंबा दिला आणि सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली होती.

एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले. दरम्यान या फुटीनंतर राज्यात प्रथमच विधानसभेची निवडणूक होत असल्यानं या निवडणुकीकडे राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान यावेळी सर्वच राजकीय पक्षांसमोर दुसरं मोठं आव्हान होतं ते म्हणजे त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील नाराज नेत्याची समजूत घालून बंडखोरी टाळण्याचं. मात्र अनेक ठिकणी बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढलं आहे. त्यातच मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोहोळमधील बंडखोरी मोडून काढण्यात यश आलं आहे.

मोहोळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना बंडखोर उमेदवार संजय क्षीरसागर यांनी पाठिंबा दिला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी संजय क्षीरसागर यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. संजय क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आता त्यांनी राजू खरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकत वाढली आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं