AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाच्या नेत्याने भाजपाच्या बड्या नेत्याला कोर्टात खेचले, नेमके काय झाले ?

एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक या मूळच्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमधील संघर्ष राज्याला नवा नाही. आता शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्या नाईक यांच्या जनतादरबारालाच कोर्टात खेचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शिंदे गटाच्या नेत्याने भाजपाच्या बड्या नेत्याला कोर्टात खेचले, नेमके काय झाले ?
bjp and sena
| Updated on: Sep 19, 2025 | 9:26 PM
Share

महायुतीतील शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे ज्येष्ठ मंत्री गणेश नाईत यांच्यात विस्तव जात नाही हे सर्वांना माहीती आहे. त्यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला असताना आता गुरुवारी शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी नाईक यांच्या जनता दरबाराविरोधात न्यायालयात याचिका दाखले केल्याने महायुतीत नवा संघर्ष समोर आला आहे.

वनमंत्री गणेश नाईक हे ठाणे आणि नवीमुंबईत जनता दरबार भरवत असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करत आहेत. ते काही ठाणे आणि नवीमुंबईचे पालक मंत्री नाहीत मग ते अशा प्रकारे जनता दरबार भरवून प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण दिवस भर वेठीस कसे काय धरु शकतात असा सवाल याचिकाकर्ते किशोर पाटकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असल्यापासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील शीतयुद्ध प्रसिद्ध आहे.

राज्यात सत्ताबदल झाला तेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाले त्यानंतर या दोघातील संघर्ष वाढलेलाच पाहायला मिळालेला आहे. दुसऱ्या वेळी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले आणि भाजपात गणेश नाईक यांना वन मंत्री पद मिळाले. त्यानंतरीही या दोघांमध्ये संघर्ष सुरुच आहे. शिंदे यांच्या कोपरी-पाखाडी मतदार संघाच्या भेटीदरम्यान नाईक यांनी यापुढे कमळ फुलेल असे वक्तव्य केल्याने उभयतांमधील संघर्ष आणखीन वाढलेला असल्याचे पाहायला मिळाले.

मंत्री गणेश नाईक यांनी नवीमुंबईत जनता दरबार भरवण्यास सुरुवात केली आहे. वाशी येथील विष्णूदास भावे सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांना बोलावून लोकांचे प्रश्न सोडवले जात असतात. या याच जनता दरबाराला शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्या आक्षेप घेत याचिका केली आहे. किशोर पाटकर यांनी याचिकेत नाईक यांच्या जनता दरबारात कोणतेही प्रश्न सोडवले जात नाहीत. आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर होतो असा आक्षेप घेतला आहे.

पालघरमध्ये जाऊन जनता दरबार भरवा

एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असलेले किशोर पाटकर हे बेलापूर विधानसभा मतदार संघातील असून शिवसेनेचे ते जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी नाईक यांच्या जनता दरबाराला बेकायदा आणि नियमबाह्य म्हटले आहे.नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत. मग त्यांना पालघरमध्ये जाऊन जनता दरबार भरवावा येथे ठाणे आणि नवीमुंबईत का भरवत आहेत असा पाटकर यांचा सवाल आहे.

माझी काही हरकत नाही

यावर मंत्री हा एका भागाचा नसून संपूर्ण राज्याचा असतो. मंत्र्याला एखाद्या भागातील जनतेच्या तक्रारी ऐकायच्या असतील तर त्यांना तो अधिकार आहे. लोकांची प्रश्न सोडवण्यासाठी त्यासंबंधीचे मार्गदर्शन संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात कोणाची काहीही हरकत नसावी. जर कोणी अशी याचिका केली असेल तर त्यास माझी काही हरकत नाही असे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.