AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेची लढाई ‘नोटा’शी होती, सेनेच्या गोव्यातील पराभवावर देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका

शिवसेनेच्या गोव्यातील पराभवावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे. महाराष्ट्रातील आमदार, खासदार कार्यकर्त्यांचं आभार. चंद्रकांतदादा, तुम्ही महाराष्ट्रातून सेना पाठवली, त्या सेनेचा गोव्याच्या विजयात हात आहे. सेना म्हणजे भाजपची सेना. दुसऱ्या सेनेचं काय झालं ते पाहिलं असेल.

शिवसेनेची लढाई 'नोटा'शी होती, सेनेच्या गोव्यातील पराभवावर देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका
देवेंद्र फडणवीसांचा जबाब घरी नोंदवणारImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 11, 2022 | 11:19 AM
Share

मुंबई: शिवसेनेच्या गोव्यातील पराभवावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे. महाराष्ट्रातील आमदार, खासदार कार्यकर्त्यांचं आभार. चंद्रकांतदादा, तुम्ही महाराष्ट्रातून सेना पाठवली, त्या सेनेचा गोव्याच्या विजयात हात आहे. सेना म्हणजे भाजपची सेना. दुसऱ्या सेनेचं काय झालं ते पाहिलं असेल, असं सांगतानाच त्यांनी भाजपला हरवणार अशी गर्जना त्यांनी केली होती. त्यांची लढाई आमच्याशी नाही, नोटाशी होती हे मी सांगत होतो. राष्ट्रवादी आणि सेनेची मते एकत्र केली तरी नोटांची मते जास्त आहेत, अशी सडकून टीका देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. तसेच चार राज्यातील निवडणुकांमुळे हुरळून जाऊ नका. डोक्यात विजय जाऊ देऊ नका. आता मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सज्ज व्हा. आज रात्रीपासूनच कामाला लागा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले. तसेच आम्हाला कोणत्याही पक्षाला मुंबईपासून मुक्त करायचं नाही, मुंबईला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपने आज गोव्यातील विजयाचं जल्लोषात सेलिब्रेशन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी संबोधित करताना फडणवीसांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या मतदारसंघात जाऊन शिवसेनेने गर्जना केली होती. सावंतंना हरवणार असल्याच्या वल्गना केल्या होत्या. सेनेचे सर्व नेते तिथे गेले. प्रचार केला. पण शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त 97 मते मिळाली. हा कौल भाजपचा आहे. मोदींचा आहे. विश्वासाचा आहे. सामान्य जनतेचा आहे. मी केवळ प्रतिनिधी म्हणून गेलो. विजय तर मोदी मिळवून देणार होते, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

इतकी मळमळ बरी नाही

एक गोष्ट निश्चित सांगतो, आमच्या विजयाने सर्वांनाच आनंद झाला असं नाही. काही लोकांना इतकी मळमळ आहे की अपरिचित देवदूतांपेक्षा परिचित दैत्य बरा, असं त्यांचं झालं आहे. खरी तर इतकी मळमळ बरी नाही. तुम्ही कितीही मळमळ केली तरी मोदीच निवडून येणार. कुणालाही मळमळ कळकळ झाली तरी या देशातील गरीब आणि महिलांचा आशीर्वाद मोदींच्या मागे आहे. तरीही आम्ही जिंकणार आहोत, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

जनतेने मोदींची जादू अनुभवली

चार राज्यातील निवडणुकानंतर संपूर्ण देशाने मोदींची जादू अनुभवली. मोदी है तो मुमकीन है पाहायला मिळालं. मोदींनी सामान्य माणसाच्या मनात जो विश्वास निर्माण केला. मोदी आपल्यासाठी कधीही आहे. मोदी मरू देणार नाहीत, उपाशी राहू देणार नाहीत, बेरोजगार राहू देणार नाहीत, हा लोकांना वाटणारा विश्वास मतांमध्ये परिवर्तीत झाला, असं फडणवीस यांनी सांगितलं. गोव्यात काँग्रेसने राज्यपालांना आधीच सरकार स्थापनेसाठीचं पत्रं दिलं होतं. पण दुसऱ्या दिवशी चिटपाखरूही राजभवनावर गेलं नाही. इतकी वाईट अवस्था काँग्रेसची झाली आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

संबंधित बातम्या:

अभी तो असली लढाई मुंबई में होगी, देवेंद्र फडणवीस यांनी फुंकलं महापालिका निवडणुकीचं रणशिंग

VIDEO : मुंबईत भाजपाचा जल्लोष, फडणवीसांच्या स्वागतापूर्वी चंद्रकांत पाटलांसह पडळकर, शेलार, नितेश राणेंचा डान्स

“प्रत्येकानं बघावा असा सिनेमा कारण…”, ‘द कश्मीर फाईल्स’ रिलीज झाल्यानंतर शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.