VIDEO : मुंबईत भाजपाचा जल्लोष, फडणवीसांच्या स्वागतापूर्वी चंद्रकांत पाटलांसह पडळकर, शेलार, नितेश राणेंचा डान्स

भाजपच्या या विजयोत्सवात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसोक्त आनंद साजरा केला. यावेळी ढोल वाजवणाऱ्या कलाकाराकडून त्यांनी ढोल घेतला आणि तितक्याच उत्साहात ठेका धरला. हे पाहून इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही अधिकच उत्साह संचारला

VIDEO : मुंबईत भाजपाचा जल्लोष, फडणवीसांच्या स्वागतापूर्वी चंद्रकांत पाटलांसह पडळकर, शेलार, नितेश राणेंचा डान्स
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 10:47 AM

मुंबईः देशातील पाचपैकी चार राज्यात भाजपला दणदणीत विजय (BJP Wins) मिळाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष (BJP Celebration) साजरा केला. विशेषतः गोव्यात भाजपने बहुमत मिळवल्यामुळे तेथील प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा सत्कार समारंभ मुंबईत आयोजित करण्यात आला. यावेळी मुंबई भाजपातील दिग्गज नेत्यांना ढोल ताशांच्या गजरावर थिरकण्याचा मोह अनावर झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह आशीष शेलार, नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांनी जमके डान्स केला. मुंबई भाजपाच्या कार्यालयात गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी येथेच आनंद साजरा केला. त्यामुळे मुंबईतील भाजप कार्यालय परिसरात जणू एखादा सण, उत्सव असल्याचे स्वरुप आले आहे. भाजपचे शेकडो कार्यकर्ते आज भाजप कार्यालयासमोर जमले असून पक्षाचा ध्वज घेऊन त्यांनी आनंद साजरा केला.

Fadanvis Welcome in Mumbai

देवेंद्र फडणवीस यांचे दणक्यात स्वागत

गोवा विधानसभा निवडणुकीची प्रमुख जबाबदारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात काँग्रेसला अक्षरशः धूळ चारली. त्यामुळे फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबई भाजपतर्फे आज त्यांचा जंगी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार समारंभापूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी हा आनंद साजरा केला.

Fadanvis Welcome in Mumbai

चंद्रकांत पाटलांना ढोल वाजवण्याचा मोह अनावर

भाजपच्या या विजयोत्सवात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसोक्त आनंद साजरा केला. यावेळी ढोल वाजवणाऱ्या कलाकाराकडून त्यांनी ढोल घेतला आणि तितक्याच उत्साहात ठेका धरला. हे पाहून इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही अधिकच उत्साह संचारला. देवेंद्र फडवणीस भाजप कार्यालयात पोहोचण्याच्या आधी भाजप कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला.

इतर बातम्या-

राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी मांढरे; नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार गंगाथरन यांनी स्वीकारला

Pune Crime | पुण्यात 31 वर्षीय डिलिव्हरी बॉयने टोकाचं पाऊल उचलत संपवले आयुष्य

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.