म्यॉव म्यॉव करणारे मांजरासारखे लपलेत; दीपक केसरकरांची नितेश राणेंवर खोचक टीका

संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर कोकणातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी या प्रकरणावरून नितेश राणेंवर जोरदार टीका केली आहे.

म्यॉव म्यॉव करणारे मांजरासारखे लपलेत; दीपक केसरकरांची नितेश राणेंवर खोचक टीका
दीपक केसरकर
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 2:32 PM

सिंधुदुर्ग: संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर कोकणातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी या प्रकरणावरून नितेश राणेंवर जोरदार टीका केली आहे. म्यॉव म्यॉव करणारे मांजरासारखे लपून बसले आहेत, अशा शब्दात दीपक केसरकर यांनी नितेश राणेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.

दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. जे मांजराची नक्कल करत होते. ते आता मांजरासारखे लपून बसले आहेत. आता हे लपून राहिले नाही. जे दुसऱ्यांना चिडवतात त्यांच्यावर देव कधी ना कधी अशी वेळ आणतोच, असं सांगतानाच ते वाघाला घाबरतात की नाही माहीत नाही. ते न्यायालयाला घाबरतात की नाही हे सुद्धा माहीत नाही. पण ते घाबरत आहेत. घाबरले आहेत आणि लपून बसले आहेत ही वस्तुस्थिती आहे, अशी खोचक टीका केसरकर यांनी केली आहे.

राणे पोलिसांना घाबरतात

नारायण राणे यांचा तोल गेलेला आहे. आपण किती शूर आहे हे राणे दाखवत असले तरी ते पोलिसांना घाबरतात. ही वस्तुस्थिती आहे. राणे यांची कालची पत्रकार परिषद आपल्या मुलाला वाचवण्यासाठी होती. कोण दीपक केसरकर विचारणारे नारायण राणे यांनी आपल्या मुलाच्या खासदारकीचा झालेला पराभव आठवावा. म्हणजे दीपक केसरकर कोण हे तुमच्या लक्षात येईल, असा हल्लाही त्यांनी चढवला.

तर नितेश यांच्याही राजकीय कारकिर्दीचा अंत होईल

नितेश राणे यांनी वेळीच सुधारावे. वेळीच सुधारले नाहीत तर राणेंचा जसा राजकिय अंत झाला तसाच त्यांच्या मुलांच्या राजकीय कारकिर्दीचा अंत होईल. विरोधी पक्ष नेत्यांनी विधान सभेत नितेश राणेंना झापलं. असा पोरकट पणा करू नका म्हणून सांगितलं. तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांवर नियंत्रण आणू शकला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

मी सर्वाधिक निधी आणला

तुम्ही मुख्यमंत्री होता. विरोधी पक्षनेता होता. पण गेल्या 25 वर्षात तुम्ही जिल्ह्यात जेवढा निधी आणू शकला नाही, तेवढा निधी मी पाच वर्षांत आणला, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

12 आमदारांच्या निलंबनावर अजित पवार भाजपसोबत? 12 महिने कुणाला बाहेर न बसवण्याचं वक्तव्य

आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का? वाघाची मांजर कधी झाली? नारायण राणेंचा सवाल

VIDEO: कोण अजित पवार? मी नाही ओळखत अजित पवारांना?; नारायण राणे भडकले

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.