AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Kadam: अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला, त्याना तालुका प्रमुखही माहीत नाही; रामदास कदम यांचा थेट हल्ला

मुंबईः अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला, त्यांना शिवसेनेच्या तालुका प्रमुखाचे नावही माहिती नाही, असा थेट आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या नियुक्त्यांमध्ये रामदास कदम समर्थकांना डावलण्यात आलं. रामदास कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. या अस्वस्थतेतून रामदास कदम यांनी पत्रकार […]

Ramdas Kadam: अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला, त्याना तालुका प्रमुखही माहीत नाही; रामदास कदम यांचा थेट हल्ला
ज्येष्ठ नेते रामदास कदम
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 18, 2021 | 12:30 PM
Share

मुंबईः अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला, त्यांना शिवसेनेच्या तालुका प्रमुखाचे नावही माहिती नाही, असा थेट आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या नियुक्त्यांमध्ये रामदास कदम समर्थकांना डावलण्यात आलं. रामदास कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. या अस्वस्थतेतून रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली.

काय म्हणाले रामदास कदम?

रामदास कदम म्हणाले, अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेली 2 वर्षे ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिल्ह्यात येतात. संपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडला आहे. जिल्ह्यात कुठलाही संपर्क, समन्वय नाही. तालुका प्रमुखांचा नावही त्यांना माहिती नाही. पालक म्हणून जिल्ह्यात त्यांनी कोणतंही काम केलेलं नाही. त्यामुळेच आज जिल्ह्यात शिवसेनेच प्रचंड असंतोष आहे. त्यांच्या खासगी मालमत्तेविरोधात मी बोलणं म्हणजे शिवसेनेविरोधात बोलणं होत नाही. त्यांच्या रिसॉर्टविरोधात बोलल्यामुळेच माझ्याविरोधात घोषणा दिल्या गेल्या, असं रामदास कदम म्हणाले.

गद्दार कोण हे शिवसैनिकांना कळलं पाहिजे

अनिल परब यांच्यावर आरोप करताना रामदास कदम म्हणाले, ‘ परब यांनी माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून राष्ट्रवादीच्या संजय कदमला मातोश्रीवर आणलं होतं. त्यांनी दोन वर्षात माझ्या मुलाचा एकदाही फोन घेतला नाही. संजय कदमशी सातत्याने संपर्क ठेवला. या भागात वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना सातत्याने पाठी घालण्याचं काम केलं. अनिल परब हे कदम आणि खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत, गद्दार कोण अनिल परब की रामदास कदम हे शिवसैनिकांना कळलं पाहिजे मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेच्या मुळावर उतरला. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. योगेश कदम आमदार आहेत. त्यांनी उमेदवार पाहिले. पक्षाला कळवलं. आणि पक्षनेत्यांनी मुलाखती घेतल्या. पण संजय कदमने भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता. कदमला गाडून आम्ही भगवा फडकवला. परबने मिटिंग बोलावली या मिटिंगला तटकरे आणि सूर्यकांत दळवी होते. पाच वर्ष या सूर्यकांत दळवीने संजय कदमच्या खांद्याला खांदा लावून माझ्या मुलाविरोधात काम केलं. आमच्या पक्षाचे निष्ठावंत नेते उदय सामंत यांना बोलावून घेतलं. त्यांच्याकडून निष्ठा शिकावी लागते. त्यांना परब यांनी बोलावलं आणि तिकीट वाटप केलं. राष्ट्रवादी 9, शिवसेनाला 5 जागा. पहिले अडीच वर्ष नगराध्यक्ष राष्ट्रवादीला. शिवसेनेची पाच वर्ष सत्ता असतानाही राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद दिलं. हा निष्ठावंत कसा? असा सवाल रामदास कदम यांनी केला.

इतर बातम्या-

मोठी बातमीः औरंगाबादेतून आता शेतमालाचेही उड्डाण? केंद्रीय मंत्र्यांचे सकारात्मक संकेत, काय आहे योजना?

Chhatrapati| केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेत दोषींवर कारवाई करावी; युवराज संभाजीराजे छत्रपती, भुजबळांची मागणी

Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप