Chhatrapati| केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेत दोषींवर कारवाई करावी; युवराज संभाजीराजे छत्रपती, भुजबळांची मागणी

मंत्री भुजबळ म्हणाले की, नरेंद्र मोदी हे छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आले आहेत. मात्र, त्यांच्या भाजपच्या राज्यात या नराधमांनी हे कृत्य केले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आमची मागणी आहे.

Chhatrapati| केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेत दोषींवर कारवाई करावी; युवराज संभाजीराजे छत्रपती, भुजबळांची मागणी
युवराज संभाजीराजे छत्रपती
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 12:02 PM

मुंबईः संपूर्ण देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याचा निषेध नोंदवत याप्रकरणी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारने तातडीने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी युवराज संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhajiraje Chhatrapati) यांनी ट्वीट करून केली आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही केंद्र सरकारला खडे बोल सुनावत याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली.

नेमके प्रकरण काय?

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बंगळुरुतील एक चौकातील हा पुतळा आहे, त्याची गुरुवारी रात्री विटंबना करण्यात आल्याची माहिती आहे. त्या घटनेचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

युवराजांनी नोंदवला निषेध

बंगळुरू येथील घटनेचा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कडक शब्दांत निषेध नोंदवत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दोषींवर कारवाईची मागणी

मंत्री छगन भुजबळ यांनीही याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. भुजबळ म्हणाले की, नरेंद्र मोदी हे छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आले आहेत. मात्र, त्यांच्या भाजपच्या राज्यात या नराधमांनी हे कृत्य केले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आमची मागणी आहे. पुतळ्याला अभिषेक करण्यासाठी गेलेल्या लोकांना अडविणे योग्य नाही. आम्ही छत्रपतींना दैवत मानतो. याप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

इतर बातम्याः

Eknath Shinde : बंगळुरुतल्या गुंडांचा तीव्र निषेध, कर्नाटक सरकारनं लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं, एकनाथ शिंदेंचा इशारा

Nashik| नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.