AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मग आमचे लोक कपाळाला टिळे लावून या महागाईचे स्वागत करतील… संजय राऊत कडाडले, थेट म्हटले..

नुकताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठी टीका भाजपावर केली. यावेळी त्यांनी थेट म्हटले की, भाजपाने जर फेर निवडणुका घेतल्या तर समजले की, जनता नक्की कोणाच्या बाजूने उभी आहे. यासोबतच महागाईवही बोलताना राऊत दिसले.

मग आमचे लोक कपाळाला टिळे लावून या महागाईचे स्वागत करतील... संजय राऊत कडाडले, थेट म्हटले..
Sanjay Raut
| Updated on: May 19, 2026 | 10:24 AM
Share

पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या कितमीच्या मुद्द्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकताच भाजपावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, पंतप्रधान सध्या परदेश दाैऱ्यावर आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर पंतप्रधान भारतीय जनतेवर बोजा टाकून परदेश दाैऱ्यावर गेले. मोदींनी तुम्हाला सांगितले आहे की, तुम्हाला आता गरीब व्हावे लागेल… मी श्रीमंत आहे.. अदानीचे खटले काढून घेतले अमेरिकेतून. अदानीवर जे खटके सुरू होते अमेरिकेत ते मोदींनी काढून घेतले. काय तडजोडी झाल्या ते त्यांना माहिती, देशाला माहिती. पण या देशात अजूनही अनेक लोक खोट्या खटल्यांखाली तुरूंगात आहेत. पण गाैतम अदानी यांच्यावरील खटला मोदींनी काढून घेतला. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर संजय राऊत यांनी जय श्रीराम म्हणत थेट प्रतिक्रिया देखील यावेळी दिली.

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, अदानीचा न्याय होतो, जागतिक पातळीवर. पण आम्हाला न्याय मिळत नाही शिवसेनेला. सुप्रीम कोर्टात. महागाई वाढलेली आहे, महागाई वाढणार आहे. महागाईमुळे या देशात, मध्यमवर्गीयांमध्ये एक भीतीचे वातावरण आहे. त्यातून एक आर्थिक अराजक निर्माण होईल आणि भारतीय जनता पक्ष म्हणेल हे मुस्लिमांमुळे होतंय.

हे पाकिस्तानमुळे होतंय. मग आमचे लोक कपाळाला टिळे लावून या महागाईचे स्वागत करतील आणि भाजपालाच मतदान करतील. लोक त्यांच्या कर्माची फळे भोगत आहेत. एक काळ असा होता की, महिला महागाई विरोधात मोर्चा काढायच्या. विद्यार्थी रस्त्यावर यायचे. महागाईविरोधात रस्ता रोखो व्हायचाे. आंदोलने व्हायची.

आज अशाप्रकारची आंदोलने लोकांनी करणे हा मोदींच्या राजवटीत देशद्रोहाचा गुन्हा ठरतो. त्यांच्यावर खोटी कलमे टाकून त्यांना अटक केली जाते. काय करणार तुम्ही.. एकतर उपासमारीमुळे मेले पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांप्रमाणे महागाईने नाही तर मग जय श्रीराम म्हणत गप्प बसायचे. भारतीय जनता पक्ष हा जमिनीवरचा पक्ष नाही. भारतीय जनता पक्षाची सरकार ही गैरमार्गाने आलेली सरकार आहे. ज्यावेळी भारतीय जनता पक्ष फेर निवडणुका घेईल, त्यावेळी कळेल की लोक कोणासोबत उभे आहेत.

Follow Us
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?