AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळताच संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया

संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोची मोठी जबाबदारी दिली आहे. मंत्रिपदाच्या सर्व सुविधा आहे. कॅबिनेट मंत्रीपदाचा सर्व अधिकार आहे", असं संजय शिरसाट म्हणाले.

सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळताच संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया
आमदार संजय शिरसाट
| Updated on: Sep 16, 2024 | 10:05 PM
Share

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना विधानसभा निवडणुकीआधी मोठी संधी मिळाली आहे. राज्य सरकारकडून संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने ही जाबाबदारी दिल्यानंतर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली. मंत्रीपदाची अपेक्षा होती. शिंदे मला मंत्री करणारच होते. मात्र नेत्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. असं केलं तर गाडी सुरळीत चालते. मला आज त्याची प्रचिती आली. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोची मोठी जबाबदारी दिली आहे. मंत्रिपदाच्या सर्व सुविधा आहे. कॅबिनेट मंत्रीपदाचा सर्व अधिकार आहे. अध्यक्षांना मोठे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. म्हणून योग्य निर्णय घेणे, नागरिकांना किचकट ठरणाऱ्या अटी काढून टाकणे हे माझं काम राहील”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

संजय शिरसाट यांना यावेळी सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार कधी स्वीकारणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मी गुरुवारी ४ वाजता पदभार स्वीकारणार आहे. नवी मुंबई विमानतळ विस्ताराचा निर्णय होईल, तिकडे डेव्हलपमेंट होईल. सिडकोमध्ये अनेक कामे थांबवले जातात. त्याला सोडवण्यासाठी काम करणार. आठवड्यातला एक दिवस सामान्य लोकांसाठी देणार आहे”, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.

संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका

संजय शिरसाट यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “मी चुकीचं काय बोललो? शिवसेनाप्रमुखांच्या लाईनवर तुम्ही कुठे आहे? तुम्ही शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुण गाता? तुमच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवला गेला. त्यामुळे निष्ठेच्या गप्पा आम्हाला शिकवू नका. निष्ठा आम्ही टिकवून ठेवली आहे. त्यावरच आम्ही वाटचाल करतो. मिंधे, गद्दार मानल्याने नाही. आताच्या घडीला सर्वात पहिला पसंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.

“तुम्ही आम्हाला गद्दार म्हणाल, गाडाल, तुमच्यासाठी 100 गुन्हे माफ? आम्ही चोर भामटे आहोत का? आम्हाला तुमच्याबद्दल बरे शब्द काढायचा नाही. आताही उद्धव साहेब म्हणतो. पण तुम्ही आम्हाला खेचायचा प्रयत्न करत असाल तर आमचाही स्वाभिमान आहे. मग आम्ही कशाला गय करणार? खासदार संजय राऊतांची भाषा तुम्ही बोलत असाल तर तुमच्यात आणि संजय राऊतामध्ये काय फरक राहिला? ही लाईन तुमच्यासाठी नाही. शिवसेनाप्रमुखांच्या वंशज म्हणून ज्याप्रमाणे बोललं पाहिजे, शब्दात वजन असलं पाहिजे. टोमणे मारणे हा तुमचा स्वभाव आहे का? त्यामुळे सहनशीलता असते. सहनशीलतेच्या पुढे जाऊ नये”, असं देखील संजय शिरसाट यावेळी म्हणाले.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.