AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पितृपक्ष संपताच शिवसेना ठाकरे गटाला बसणार मोठा हादरा? बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहेत. मात्र त्याचपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचा दावा मोठ्या नेत्याकडून करण्यात आला आहे, या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

पितृपक्ष संपताच शिवसेना ठाकरे गटाला बसणार मोठा हादरा? बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2025 | 9:46 PM
Share

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, यापूर्वी घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवन येथे ठाकरे गटांच्या शाखाप्रमुखांची बैठक पार पडली होती. तर दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे देखील आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक देखील पार पडली, या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब देखील उपस्थित होते,  तर शाखाप्रमुखांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील युतीबाबत मोठं विधान केलं आहे, चर्चा सुरू आहे, मनसेबाबत युतीचा निर्णय लवकरच घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आज दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आमची महत्त्वाची बैठक होत आहे,  सध्या पितृपक्ष सुरू आहे, तो संपताच मोठे गौप्यस्फोट आणि धक्के हे दिलेच जातील, असा दावा शितल म्हात्रे यांनी केला आहे, म्हात्रे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  राज ठाकरे युतीबाबत एक चक्कार शब्द देखील काढत नाहीत, मात्र उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याने त्यतून ही वक्तव्य होत आहेत. दिघे साहेबांबाबत राऊत जे काही बोलत आहेत,  त्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं गांभीर्याने पहात नाहीत.  ज्यांनी कफन आणि खिचडीतून पैसे खाल्ले त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही यावेळी म्हात्रे यांनी लगावला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...