AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना दणका, 35 नेत्यांचा राजीनामा, ठाकरे गटाला मोठं खिंडार

मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे.

मोठी बातमी! फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना दणका, 35 नेत्यांचा राजीनामा, ठाकरे गटाला मोठं खिंडार
| Updated on: Jan 21, 2025 | 3:29 PM
Share

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ  पवार यांनी राजीनामा दिला.  2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा – कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटचे उमेदवार देखील होते. एकनाथ पवार यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत नाहीत तोच आता भाजपनं छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. जिल्ह्यात पक्षाला खिंडार पडलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 35 स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

लवकरच महापालिका निवडणुका लागू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.  त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 35 स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची ताकत आणखी वाढली आहे.

शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. शिवसेना ठाकरे गटातील नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सोमवारीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ  पवार यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. जळगावमधील शिवसेना ठाकरे गटाचे काही नाराज माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी देखील एक बातमी समोर येत आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी काल मोठा दावा केला आहे. 23 जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संर्पकात असून, ते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत, असं शेवाळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे 23 तारखेला नेमकं काय घडणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल