2400 चौ.फू. बंगल्याला किल्ल्याचा आकार, जळगावात शिवप्रेमीने रायगड साकारला

नशिराबाद गावात एका शिवप्रेमीने चक्क स्वतःच्या बंगल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे नक्षी काम केले (Shivaji Maharaj bungalow jalgaon) आहे.

Shivaji Maharaj bungalow jalgaon, 2400 चौ.फू. बंगल्याला किल्ल्याचा आकार, जळगावात शिवप्रेमीने रायगड साकारला

जळगाव : नशिराबाद गावात एका शिवप्रेमीने चक्क स्वतःच्या बंगल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे नक्षी काम केले (Shivaji Maharaj bungalow jalgaon) आहे. बंगल्यावर केलेल्या गड-किल्ल्यांची प्रतिकृती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत आहेत. बांधलेले घर हे सर्वसामान्यांचे आकर्षण ठरताना दिसत आहे. या बंगल्याला रायगड असे नाव दिले असून त्यावर भव्य दिव्य अशी महाराजांच्या मुर्तीची स्थापना (Shivaji Maharaj bungalow jalgaon) केली आहे.

Shivaji Maharaj bungalow jalgaon, 2400 चौ.फू. बंगल्याला किल्ल्याचा आकार, जळगावात शिवप्रेमीने रायगड साकारला

जळगाव शहरापासून अवघ्या 14 किमी अंतरावर असलेल्या नशिराबाद गावातील गणेश चव्हाण यांचे हे घर आहे. समाजसेवेचा वसा हाती घेतला असून शिवाजी महाराज हेच त्यांचे दैवत आहेत, असं ते नेहमी सांगत असतात.

गणेश चव्हाण हे अनेक शिवप्रेमींना घेऊन रायगड, प्रतापगड यासह अनेक गड-किल्ल्यांवर भेटी देत असतात. त्यासोबत तरुणांना शिवाजीमहाराजांचे आचार-विचार मनात रुजविण्याचे ते नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांनी चक्क गड किल्यांचे प्रतिरुप आपल्या राहत्या घरात उभारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे हे घर पाहण्यासाठी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलही आले होते.

Shivaji Maharaj bungalow jalgaon, 2400 चौ.फू. बंगल्याला किल्ल्याचा आकार, जळगावात शिवप्रेमीने रायगड साकारला

विशेष म्हणजे विद्यार्थ्याना शिवाजी महाराजांचे आचारविचार आणि गड किल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून गणेश चव्हाण यांनी नशिराबाद येथे 2400 स्क्वेअर फुटमध्ये सुंदर बंगला बांधला. या बंगल्यात ठीक -ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि आई तुळजाभवानीचे छायाचित्र लावले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतःच्या घराला गड किल्ल्यासारखी रंगरंगोटी करुन एक वेगळाच आदर्श घेत त्यांनी हा बंगला तयार केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *