कोल्हापुरातील शिवप्रेमीची अनोखी कहाणी, पठ्ठ्याने स्कूटरच शिवमय केली

कोल्हापुरातील एका शिवभक्ताने आपली स्कूटर शिवमय करून टाकलीय, जी सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलीय (Shivpremi decoration to scooter in Kolhapur).

कोल्हापुरातील शिवप्रेमीची अनोखी कहाणी, पठ्ठ्याने स्कूटरच शिवमय केली

मुंबई : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती जगभर आहे. महाराजांबद्दलचं प्रेम शिवभक्त वेळोवेळी दाखवून देत असतात. त्यासाठी कोणतीही किंमत मोजयलाही ते तयार असतात. कोल्हापुरातील अशाच एका शिवभक्ताने आपली स्कूटर शिवमय करून टाकलीय, जी सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलीय. तो शिवभक्त कोण आहे आणि त्याच्या स्कूटरचं वेगळेपण काय याबाबत आजआम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत (Shivpremi decoration to scooter in Kolhapur).

कोल्हापूर तांबड्या पांढऱ्या रस्स्याबरोबरच ओळखलं जातं ते इथल्या लोकांच्या हैशेसाठी! विशेषता गाड्यांच्या बाबतीत तर कोल्हापूरकर फारच उत्साही. नव्या आणलेल्या गाड्यांवर लाखो रुपये खर्च करून गाडीचा लूक बदलल्याची अनेक उदाहरणं कोल्हापुरात आहेत. याच कोल्हापुरातील राजू पाटील या कामगाराने स्कूटरच्या हौशे सोबतच शिवप्रेमही जपलंय (Shivpremi decoration to scooter in Kolhapur).

राजू पाटील या शिवभक्ताने एक-दोन नाही तर तब्बल दहा वर्षांपासून हा छंद जपलाय. लहान मुलांना स्कूटरचं आकर्षण असतं. याच आकर्षणाचा उपयोग शिवशंभू चरित्र समजावण्यासाठी राजू पाटील यांनी खुबीने केलाय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांचे सैनिक, शिवमुद्रा, तोफांची प्रतिकृती, इतकंच नाही तर मेडीकल किट आणि सॅनिटाझर बाटली अशा विविध साहित्यांनी सज्ज राजू पाटील यांचेही स्कूटर कोल्हापुरात आकर्षण ठरतेय.

राजू पाटील हे शहरातील उद्यम नगरमधल्या एका कारखान्यात 1 हजार रुपये मासिक पगारावर काम करतात. पत्नी आणि मुलाची जबाबदारीही त्यांच्यावरच, मात्र अशा परिस्थितीतही पगारातील पैसे साठवून त्याचबरोबर ओव्हर टाईममधून आलेला पैसा त्यांनी आपल्या स्कूटरसाठी खर्च केलाय. गेल्या दहा वर्षात त्यांनी या शिवशंभू प्रेमासाठी एक लाख रुपयेपर्यंत खर्च केलाय. इतकंच नाही तर शिवजयंतीला याच आपल्या लाडक्या स्कूटरवरून ते किल्ल्यांची सफर ही करतात.

परिस्थिती बेताची असतानाही शिवशंभूचा इतिहास लहान मुलांपर्यंत पोहोचावा यासाठी राजू पाटील यांच्या सुरू असलेल्या धडपडीचा अभिमान त्यांच्या सहकाऱ्यांनाही आहे. इतिहासाचा अभिमान, तो जतन करण्याची इच्छा असेल तर कोणत्याही परिस्थितीत ते जतन करता येतं याचच एक उत्तम उदाहरण कोल्हापूरच्या राजू पाटील यांनी दाखवून दिलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI