AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात रामाच्या नावाची बदनामी कोण करतंय? धर्माची भांग पिऊन लोकांनी गप्प पडावे, हे मूळ कारस्थान, शिवसेनेची ‘सामना’तून आगपाखड

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी रामाच्या नावाने दंगलींचा आगडोंब पेटवून त्या आगीवर पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाची भाकरी शेकण्याची ही दळभद्री योजना आहे, असा आरोप शिवसेनेने काला आहे.

महाराष्ट्रात रामाच्या नावाची बदनामी कोण करतंय? धर्माची भांग पिऊन लोकांनी गप्प पडावे, हे मूळ कारस्थान, शिवसेनेची 'सामना'तून आगपाखड
Image Credit source: social media
| Updated on: Apr 01, 2023 | 8:01 AM
Share

मुंबई : अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) उभे राहत आहे. सगळं काही शांततेत सुरु असताना पुन्हा रामाच्या नावाने महाराष्ट्रात हिंसा (Riots) का भडकवली जातेय. दंगलींचा आगडोंब पेटवून त्या आगीवर पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाची (Hindutwa) भाकरी शेकण्याची दळभद्री योजना आहे. अदानी भ्रष्टाचारावरील लक्ष विचलीत करण्यासाठी हे प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागण्यात आलंय. राज्यासह देशात रामनवमीच्या निमित्ताने जे घडले ते ‘रामनाम सत्य’ नसून रामनामाची बदनामी आहे. राम हे मर्यादापुरुषोत्तम होते, पण त्यांच्या नावाने दंगा करणाऱ्यांनी मर्यादाच ओलांडल्या. राम जीवनाचा हिस्सा आहे. जीवनाचा हिस्सा असा हिंसक होऊन कसे चालेल? पण देशात तेच चालले आहे, देश लुटणाऱ्या अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडून जावे व दंगलीचा उन्माद माजवून लोकांनी धर्माची भांग पिऊन गप्प पडावे व त्याच भांगेच्या नशेत मतदान करावे असे हे कारस्थान आहे, असा आरोप सामनातून करण्यात आलाय.

‘यांना दंगलीच हव्यात’

राम हे हिंदुस्थानचे महानायक मानले जातात. त्या महानायकाचा जन्मदिवस दंगलीसाठी ओळखला जावा हे त्या महानायकाचे दुर्दैव म्हणावे लागेल. रामनवमीच्या पूर्वसंध्येस व त्याच दिवशी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मुंबईतील मालवणी येथे दंगली झाल्या. गुजरातमधील वडोदरा येथे दोन धार्मिक गटांत दगडफेक झाली. प. बंगालातील हावडा येथेही रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान दंगल घडविण्यात आली. हे सर्व हिंदू-मुसलमानांत झाले व भाजपास हवे तेच झाल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

सर्व काही पूर्वनियोजित?

दंगलीमागच्या डोक्यांनी मुहूर्त साधला तो श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येचाच. दोन गटांतील वादानंतर मुस्लिमांच्या जमावाने राममंदिरासमोरच धुमाकूळ घातला. पोलिसांची वाहने जाळली. राममंदिराजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, पण हे असे अचानक का घडले? की सर्व काही पूर्वनियोजित व ठरल्याप्रमाणे घडले? असा सवाल शिवसेनेने विचारलाय. छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात जमाव अनियंत्रित झाला व पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या दंगलीत एकाचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. शहरातीलच हर्सुल भागातील ओहर येथेदेखील रामनवमीनिमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत तरुणांच्या दोन गटांत हाणामारी झाली. छत्रपती संभाजीनगरात रामनवमीच्या निमित्ताने अचानक अशी दंगल का उसळावी? हे कोण महाभाग आहेत, ज्यांना महाराष्ट्राला चूड लावायची आहे,अशी आगपाखड सामनातून करण्यात आली आहे.

निवडणुकांसाठी हिंसा?

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी रामाच्या नावाने दंगलींचा आगडोंब पेटवून त्या आगीवर पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाची भाकरी शेकण्याची ही दळभद्री योजना आहे, असा आरोप शिवसेनेने काला आहे. देश लुटणाऱया अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडून जावे व दंगलीचा उन्माद माजवून लोकांनी धर्माची भांग पिऊन गप्प पडावे व त्याच भांगेच्या नशेत मतदान करावे असे हे कारस्थान आहे. रामनवमीच्या निमित्ताने जे घडले ते ‘रामनाम सत्य’ नसून रामनामाची बदनामी आहे. राम हे मर्यादापुरुषोत्तम होते, पण त्यांच्या नावाने दंगा करणाऱयांनी मर्यादाच ओलांडल्या. राम जीवनाचा हिस्सा आहे. जीवनाचा हिस्सा असा हिंसक होऊन कसे चालेल? असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आलाय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.