‘शिवसेनेच्या हिंदुत्वाला बाळासाहेबांचा वारसा; भाजपचं हिंदुत्व म्हणजे नाटकबाजी’

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यावर अनेक संकटं आली आहेत. मात्र, केंद्र सरकारने राज्याला फुटक्या कवडीची मदत केली नाही. | Sanjay Rathod

'शिवसेनेच्या हिंदुत्वाला बाळासाहेबांचा वारसा; भाजपचं हिंदुत्व म्हणजे नाटकबाजी'
संजय राठोड

अमरावती: शिवसेनेच्या हिंदुत्वाला बाळासाहेबांचा वारसा आहे. याउलट भाजपचं हिंदुत्व म्हणजे केवळ नाटकबाजी असल्याची अप्रत्यक्ष टीका राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी केली. शिवसेनेचे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. मात्र, काहीजण हिंदुत्वाच्या नावावर नाटकबाजी करत असल्याचे सांगत राठोड यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.  (Shivsena leader Sanjay Rathod criticised BJP)

ते मंगळवारी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी कायदे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केले. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यावर अनेक संकटं आली आहेत. मात्र, केंद्र सरकारने राज्याला फुटक्या कवडीची मदत केली नाही. राज्याच्या हक्काची जीएसटीच्या परताव्याची रक्कमही केंद्र सरकारने दिलेली नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही राठोड यांनी केला.

‘विरोधकांनी कितीही जोर लावला तरी सरकार पडणार नाही’

राज्यातील महाविकासआघाडी सरकार मजबूत आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी सरकार पडणार नाही, असे राठोड यांनी म्हटले. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरूनही केंद्राल लक्ष्य केले. कृषी कायदा हा काळा कायदा आहे. यावरुन शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याची प्रतिक्रिया संजय राठोड यांनी व्यक्त केले.

‘यांची’ लहर आणि झटका म्हणजेच नियम आणि कायदा: दरेकर

UK मधील कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आणि नाताळ, नववर्षाच्या सेलिब्रेशनला होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारनं रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यावरुन आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडी सरकार भांबावलेलं आहे. यांना आलेली लहर आणि झटका म्हणजेच नियम आणि कायदा होतो, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

संबंधित बातम्या:

बाळासाहेब सानपांच्या ‘घरवापसी’नंतर शिवसेनेचाही पक्षप्रवेशाचा धडाका

सानपांच्या प्रवेशानं भाजपची डोकेदुखी वाढली! अनेक नगरसेवक रामराम ठोकणार?

‘यांची’ लहर आणि झटका म्हणजेच नियम आणि कायदा! – दरेकर

(Shivsena leader Sanjay Rathod criticised BJP)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI